कारंजा विनोद नंदागवळी
तहसील व बांधकाम विभाग कार्यालयासमोरच रस्त्यावर खड्डे खड्डे असल्यामुळे लगतच्या वस्तीतील सांडपाणी येत असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे सातच्या पावसाळ्यामुळे पाणी आणि सांडपाणी खड्ड्यामध्ये सासल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे व तसेच टू व्हीलर चालवणाऱ्यांना व पैदल चालणाऱ्या नागरिकांना यातून वाट शोधताना अनेक किरकोळ अपघात घटना घडल्या आहेत आतापर्यंत अनेकांनी ह्या खड्डा बुजवण्यासाठी आणि सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी संबंधिताकडे केली परंतु सार्वजनिक बांधकाम अधिकारी जोशी कुंभ करण्याच्या झोपेत असल्याची चर्चा जनतेमध्ये सुरू आहे त्यामुळे तहसील कार्यालयात रस्त्यावरील हा खड्डा आता जीवघेणा ठरत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तहसील परिसरात मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी होत आहे विद्यार्थ्याला शिक्षणासाठी लागणारे दाखले काढण्यासाठी विद्यार्थी आणि निराधारांची नागरिकांची तहसील कार्यालयात मोठी गर्दी होताना दिसत आहे अशा परिस्थितीमध्ये रस्त्यावर खड्डे मुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दाखल घ्यावी अशी मागणी नागरिकाकडून होत आहे

0 Comments