Ticker

6/recent/ticker-posts

*मंगरूळपीर येथे कारगिल दिवस उत्साहात साजरा*

 

मंगरूळपीर ता 27


शहरालगत असलेल्या नवीन सोनखास येथील मिलिंद नगरात दिनांक 26 रोजी "ऑल इंडिया समता सैनिक दल,सब डिव्हिजन च्या वतीने 25 वा कारगिल विजय दिन उत्साहात साजरा करण्यात आला 


 येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात कारगिल विजय दिन कंपनी कमांडर आयु. हवालदार नंदकिशोर मनवर यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली साजरा करण्यात आला.

भारतीय सैनिकांच्या जीवनातील हा दिवस म्हणजे पराक्रमचा,शौर्याचा,आणि भारतीयांच्या मनात कायम स्मरणात राहील असा हा दिवस आहे.

      दि.3 मे 1999 ते 26 जुलै 1999 या कालावधीत भारत आणि पाकिस्थान च्या सैन्यात 84-85 दिवस हे युद्ध चालले. यात भारताचे 527 सैनिक  शहीद व बरेच सैनिक जखमी झाले. यातील शहीद सैनिकांना पुष्पचक्र अर्पण करुन मानवदंना देऊन अभिवादन करण्यात आले.या वेळी नायब तहसीलदार आयु. गजानन जवादे साहेब,सहाय्यक पोलीस अधिकरी निलेश शेम्बरे,माजी नगराध्यक्ष अशोक भाऊ परळीकर, महाराष्ट्र राज्य मावळा संघटनेचे राहुदेव मनवर,सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील,यांचीही विशेष उपस्थिती होती.

कारगिल च्या युद्धात प्रत्यक्ष सैन्यदालत सहभागी असलेले हवालदार नंदकिशोर मनवर,भीमराव मनमोडे,हरिभाऊ इंगोले,नरहरी भगत,शालिग्राम सावंत,अशोक चौधरी,अशोक जितेंद्र खिराडे,किसन भगत,विजय इंगोले,मनोहर राऊत,गोवर्धन मनवर,शालिग्राम चुंबले,  गौतम मनवर,विष्णू मनवर,मिलिंद ठाकरे, मनवर,विनायक खडसे,विनोद पाटील, संतोष भगत,अशोक काजळे, प्रशांत भगत,हवालदार सुधाकर अर्जुने,आदी सैनिकांनी मानवंदना  दिली.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन राहुलदेव मनवर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करता

कांताबाई भगत रेखाबाई कांबळे राजकन्या पंडित रत्नमाला आगमे आशाबाई भगत मीनाक्षी मनोहर उषाबाई मनोहर वनमाला खाडे आदींनी पुढाकार घेतला होता

Post a Comment

0 Comments