
वाशिम : आकांक्षित असलेल्या वाशिम जिल्ह्याचा औद्योगिक विकास पाहीजे त्या प्रमाणात झाला नाही. ही बाब आ. भावनाताई गवळी पाटील यांनी वाशिम येथील महिला मेळाव्यात मुख्यमंत्री एकना थराव शिंदे यांच्या निदर्शनात आणून दिली होती. तसचे कारंजा येथे एमआयडीसी सुरु करण्यासाठी पुढाकार घेण्या ची मागणी माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष युसुफ पुंजाणी यांनी केली होती. याच संदर्भात भावनाताई गवळी पाटील यांच्या शिष्टमंडळाने नुकतीचे उद्योगमंत्री उदय सावंत यांची मुंबई येथे भेट घेवून राज्याच्या ८१ हजार कोटींच्या औद्योगिक प्रकल्प ात वाशिम जिल्ह्याला स्थान देण्याची मागणी केली. यावेळी ना. उदय सावंत यांनी वाशिम व कारंजा एमआयडीसीच्या विकासासंदर्भात लवकरच अधिसुचना काढणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे वाशिम व कारंजा येथील एमआयडी सीचा कायापालट होणार आहे. औद्योगिक क्षेत्रात मागे अस लेल्या वाशिम जिल्ह्याला विकास पथावर मार्गस्थ करण्यासाकरीता आ. भावनाताई गवळी पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. वाशिम येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण व महिला मेळावा कार्यक्रमाकरीता ४ मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आले होते. या मेळाव्यात आ. भावनाताई गवळी पाटील यांनी जिल्ह्या तील औद्योगिक वसाहतीमध्ये छोटे-मोठे उद्योग उभे व्हावे, यासाकरीता उद्योजकांना सदर वसाहतीमध्ये मुलभुत सुविधासह आवश्यक बाबी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी वाशिम व कारंजा एमआयडीसी संदर्भात लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते. राज्यात गुंतवणुकदारांचा ओघ वाढत असून ८१ हजार १३७ कोटी रूपये गुंतवणुकीच्या विशाल आणि अतिविशाल अशा सात प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या उद्योग विभा गाच्या मंत्रीमंडळ उपसमितीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित लिथियम बॅटरी, इलेक्ट्रीक व्हेईकल, सेमीकंडक्टर चिप, फळांचा पल्प निर्मिती प्रकल्पांचा समावेश असून कोकणसह मराठवाडा, विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणा वर गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे राज्यात सुमारे २० हजार जणांना प्रत्यक्ष रोज गार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आ. भावनाताई गवळी पाटील यांच्या एका शिष्टमंडळाने यांनी मंगळवारी उद्योगमंत्री उदय सावंत यांची भेट घेवून आकांक्षित असलेल्या वाशिम जिल्ह्यातील वाशिम व कारंजा येथील एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात चर्चा केली. तसेच ८१ हजार कोटीच्या प्रकल्पात वाशिम जिल्ह्याला स्थान देवून वाशिम येथील एमआयडीसी मध्ये आवश्यक त्या सोयी सुविधा उभारणी सोबतच कारंजा येथील एमआयडीसीच्या जागेसोबतच इतर सर्व बाबीसंदर्भात लवकरच अधिसुचना काढण्यात येणार असल्याचे सांगीतले. यावेळी आ. भावनाताई गवळी पाटील यांच्या सोबत कारंजा न.प.चे माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष युसुफ पुंजाणी यांची उपस्थीती होती. उद्योग उभारणीकरीता प्रयत्न करणार आ. भावनाताई गवळी पाटील वाशिम जिल्ह्यात मोठे सिंचन प्रकल्प होत नसल्याने कृषी विकासाला मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात उद्योग धंदे उभारल्या शिवाय पर्याय नाही. महायुती सरकारच्या माध्यमातून येणार्या काळात एमआयडीसी क्षेत्रात उद्योग धंदे उभे करण्यावर अधिक भर देण्याचा प्रयत्न करणार आहे. असे आ. भावनाताई गवळी पाटील यांनी यावेळी बोलतांना सांगीतले.
0 Comments