# ✊ *एकतेचा आदर्श* *श्रध्दा,भक्ती,विश्वास,भावना,उपासना,परंपरा याचा आदर्श संगम*
वाशीम जिल्ह्य़ाच्या मंगरूळनाथ तालुक्यातील शहराच्या पूर्वेला अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर *चेहेल* हे एक बाराशे लोकसंख्या असलेले छोटेशे पण तेवढेच टुमदार *गाव*!
याच गावात *59* वर्षापुर्वी त्या काळात *25/30* वर्ष वय असलेले *देवीदास कळणाजी चौधरी, विठ्ठल रावजी ईगोले याचेसह धार्मिक वृत्तीच्या समवयस्क तरूणानी एका मातीच्या भिती असलेल्या दहा बाय दहा च्या खोलीत मनोभावे,श्रध्दा पूर्वक, भक्ती भावाने पवित्र अंतःकरण व उद्देश ठेवून उल्हासात गणेश चतुर्थी ला गणपतीची स्थापना केली*. त्या काळी अतिशय कमी लोकसंख्या असलेल्या गावात फक्त तिन जातीचे लोक *कुणबी, बंजारा बौध्द* गुण्या गोविंदाने नादत होते. आजही नादतात. अशा *चेहेल* या गावात *गणेश चतुर्थीला* गणपती स्थापनेपासून सर्व गावकरी सकाळ संध्याकाळ आरती ला एकञ यायचे! भक्ती भावाने आरती करायचे! आरतीनंतर प्रसाद सेवन करून घरी जायचे!
चेहेल येथील गणेशोत्सवात स्थापनेपासून म्हणजेच 59 वर्षापासूनच अनेक धार्मिक,सांस्कृतिक, परंपरेचे काटेकोर पालन केले जाते. जसे गणपती ची स्थापना ही गणेश चतुर्थीला सर्वञ होते तशी ती चेहेल येथे ही होते. पण विसर्जन बहुतांश गावात वेग वेगळ्या दिवशी,वेग वेगळ्या तारखेला वेग वेगळ्या तिथीनुसार वेग वेगळ्या वेळे वर होत असताना, चेहेल या गावात मात्र गणेश विसर्जन स्थापनेपासूनच *अनंत चतुर्दशी* लाच करण्यात येते. हे *वैशिष्ट्य* व परपरा यात कधीही कोणत्याही कारणाने *खंड* पडला नाही. किंवा बाधा आली नाही. या दिवशी आजपर्यंत मृत्यु झाला नाही की वाईट घटना घडली नाही त्यामुळे ती परंपरा आजही अखंडित असून अविरत सुरू आहे.
59 वर्षापुर्वी स्थापन झालेल्या गणपतीची वर्ष जात होती.
वर्षांगणिक लोकसंख्येत वाढ होत असताना, लोकांच्या भक्तीत पण वाढ होत होती. गणेशोत्सव काळात गाव भक्तीमय व्हायच! जस जशी गावकऱ्यांची पुजा-अर्चा श्रध्दा व भक्ती वाढत होती. तशे गणेश गणपती गावकऱ्यांना आशीर्वाद देत होते. मग गावकऱ्यांच्या भावना, श्रध्दा वाढत जात होती.
1965 ला चेहेल च्या गणेशाची स्थापना झाल्यानंतर त्यावेळेच्या संस्थापकांपैकी एक असलेले देवीदास चौधरी याना चवथे *कन्या रत्न झाले. घरात लक्ष्मी आगमनाने आनंदी आनंद झाला. रागणे,टोगळ्यावर चालणे,नंतर पायावर मुल चालायला लागल की आई वडिलांचा आनंद गगनात मावत नाही. तस देवीदास चौधरी व दाम्पत्या च झाल. मुलीच नामकरण झाल. नंदा हे नाव ठेवण्यात आल. मुलगी ही तुरू तुरू चालत होती. *देवीदास चौधरी हे त्या काळातील गावातील सर्वात गर्भश्रीमंत *कळणाजी पाटील* याचे एकुलते एक पुञ होते. घरात लक्ष्मीचा वास होता. तसाच ईश्वराने कळणाजी पाटील याना दोन नाती च्या रुपाने लक्ष्मी दर्शन देऊन भेट दिली होती. त्यामुळे तर सगळा आनंदी आनंद होता. घरात *वाघिणी* च दुध सोडल तर सगळ्याच सुख वस्तु ची रेलचेल होतीच, कोणतीही कमी नव्हती. मग भगवंताला काय मागाव ‼मागण्यासारख काही नव्हतच!
शभर एकराचे जवळपास शेती होती. अतिशय सुपीक, जवळपास बागायती, बारा बैल,खडी न गायी म्हशी, त्या काळातील (इनोव्हा) *डमणी,* (क्रेटा) *शेकळ*, (स्विफ्ट डिझायर) *रिगी,* तर (क्रुझर) *बैलगाडी* अशा भौतिक सुख चैन वस्तु तर होत्याच पण अलिशान ऐसपैस टुमदार *घर* पण होत. त्या मुळे भगवंता कडे मागण्यासारख काही नव्हत. त्या मुळे गणेशाची भक्ती भावाने पुजा अर्चना करणे,मनोभावे सेवा करणे, विसर्जनानंतर स्व खर्चाने सर्व गावाला पंगत देणे. हा नित्य क्रम चालू होता. सेवा चालू होती. भक्ती वाढत चालली तस भगवंतावरच सेवेच कर्ज वाढत चालल होत. *भगवंत* देवीदास चौधरी याचे परिवाराकडून काही मागण्याची, वाट पाहत होते. पण देवीदास चौधरी याचे सारखा अत्यंत सुखी, संपती ने श्रीमंत तसाच मनाने श्रीमंत असलेला, ईश्वराने दिलेल्या *वैभवात* समाधानी असणारा माणूस भगवंताला काय मागणार ‼
भगवंत सेवेने प्रसन्न झाले होते. ते मागण्याची वाट पाहत होते. पण देवीदास पाटील याच्या पत्नी द्वारका बाई याची धार्मिकता, श्रध्दा,भक्ती, सेवा यामुळे भगवंत कर्जाच्या ओझात डुबूत चालले होते. ते हे परिवार काही तरी मनोकामना करतील, मागण मागतील. काही *नवस* तरी करतील ही आशा बाळगून होते. पण या परिवाराची *निस्वार्थ भक्ती, निस्सीम प्रेम* पाहून *गणपती बाप्पा* अवाक झाले. म्हणतात ना भगवंत आपल्याकडे भक्ताच ऋण *शिल्लक ठेवत नाही. मागितल्यावर तर देतोच पण मागण्याच्या आधी ही देतो. इथे तर सगळं च मुबलक होत. मग द्यायच काय ‼ हा प्रश्न *गणपतीरायाला* पडला.
आता ते *भगवंत* त्याच्या जवळ सगळ्याच प्रश्नाच उत्तर, समस्याच समाधान, आजारावर औषध, संकटांवर मात करण्याची माञा, कठीणात कठीण परिस्थितीतीवर उपाय ‼ सगळे मंञ भगवंताकडे आहे. जस *विचू उतरविणाराकडे चढवण्याचा ही मंञ असतो* तस ते तर मग *भगवंत* ते काय नाही करतील!
भगवंतानी ठरवल देवीदास चौधरी व द्वारका बाई याना आपल्या दारात *नवस* मागायला बोलवायच ‼ गणरायानी कळणाजी पाटील याची नात देवीदास पाटील व द्वारका बाई याची चवथे अपत्य दुसरी मुलगी असलेल्या *नंदा* मुलगी छान पैकी टुमकत टुमकत चालत होती. चार भावंडात सर्वात लहान असल्यामुळे सर्वाची लाडकी‼ गणपती रायानी तिच्यावरच आपला *प्रयोग करायच ठरवल! लक्ष्मी सारखी देखणी, स्वरूपवाण, चांगली चालत असताना तिच्या पायावर आपली वक्रदृष्टी टाकली! मग काय ‼ दिवसे दिवस पाय जास्तच वागडा पडत होता. चालताना ञास होऊ लागला! त्या काळात *पोलीओ* हा आजार जोरात होता. पोलीओ डोस सक्तीचे होते. गोर गरीबानी पैसे व दळण वळणाचे साधन नसताना पोलीओ डोस दिले. तिथे या परिवारात गर्भश्रीमंती, आर्थिक सुभता, *दळण वळणा ची घरी सर्व साधने व मनुष्यबळ असताना पोलीओ डोस दिला नसेल ‼ तर नवलच ‼ चौधरी दाम्पत्यानी वेळेवर पोलीओ डोस दिले! तरी पण अस कस झाल? मग सर्व तज्ञ डॉक्टरांना दाखवले. त्यानी सांगीतल्या प्रमाणे औषधोपचार केले. जे जे योग्य ते ते सर्व करून झाल. पण पाय काही केल्या सरळ होत नव्हता. सगळे चिंतीत पडले. ही मुलीची जात, मुलगी जर *लगडी* झाली तर‼ लंगड्या मुली सोबत लग्न करणार कोण? पुर्वी आई वडीलासमोर हाच मोठा यक्ष प्रश्न ⁉ असायचा!
मानवाचा स्वभाव आहे. माणूस अगोदर सर्व मानवी प्रयत्न करून पाहतो. मग पैशाचा वापर करतो. आणी मग विज्ञानाचा आधार घेतो. साहाजिकच आहे.
त्याला वाटते याने जमेल,त्याने जमेल! प्रत्येक व्यक्तीला भोळी आशा असते. पण सगळे *भगीरथ* प्रयत्न करून जेव्हा माणसाला *अपयश* येत.
प्रयत्न करुनही यश येत नाही. तेव्हा माणूस परिस्थिती समोर *हतबल* होतो. समोर मार्ग दिसत नाही. फक्त *अंधार* दिसायला लागतो. कोणाचाही *आधार* मिळत नाही. काय कराव म्हणून सुचत नाही. डोक्यात विचाराच *काऊर* उठत. तस देवीदास पाटील व द्वारका बाई या दाम्पत्याच झाल होत. सगळे प्रयत्न झाले. आपल्या लाडक्या लेकीसाठी अनेक दवाखाने, वेगवेगळे डॉक्टर, औषधोपचार, सगळ करून झाल‼
काही काही शिल्लक राहल नाही.
शेवटी हात ठेकले! जशे सगळ्यांचे टेकतात. परिस्थितीतीसमोर *हारले! बर सगळ घरी असताना! पैशांची अडचण नसतांना! *देवीदास पाटील व द्वारका बाई व परिवाराची होत असलेली घालमेल वरून *गणपती बाप्पा* सगळ शांत पणे पाहत होते. हसत होते! आनंद ही घेत होते. थोडक्यात सांगायच तर *मजा* पाहत होते. आणी मनात म्हणत होते, *द्वारके* तु कुठेही जा! कितीही डॉक्टर ला दाखव, दवाखान्याच्या पायऱ्या झिझव, कोणतीही औषध दे! पण पाय कोणी ही बरा करू शकत नाही.कारण मी बरा होऊ देत नाही. होऊ देणार ही नाही.
तुला माझाच दारात यावच लागेल!
माझेच पाय धरावे लागतील!
मलाच म्हणाव लागेल माझा मुलीचा पाय चांगला कर!
*देवा आता मी थकले रे* ‼
अस जेव्हा बोलशील!
तेव्हा मी विचार करीन!
आता सगळ रचलेल *गणराया न* होत.
*कथा* च त्यान लिहली होती.
*कर्ता* करविताच तो होता,
त्याचा *सुञधार* च तो होता,
तर मग काय ‼
कथेचा शेवट तोच करणार!
कामात यश पण तोच देणार!
जय पराजय त्याच्याच हातात!
त्याला ह्याना बोलवायच होत! आपली प्रचिती दाखवायची च होती! द्वारका बाई ची पुजा अर्चना; श्रध्दा भक्ती भाव दृढ करून घ्यायचा होता. नवस बोलून घ्यायचा होता.
त्या नवसाला पावाच पण होत.
आता प्रत्यक्ष देवालाच जर भक्ताला च आपल्या चरणी बोलवायच असेल तर मग त्याला सामान्य माणूस टाळू शकेल ‼ *शक्य आहे काय* ❔
वरील सांगीतल्या प्रमाण देवीदास पाटील व द्वारका बाई या दाम्पत्या समोरील सर्व मार्ग संपल्या नंतर माणसासमोर एकच मार्ग! एकच पर्याय! एकच द्वार! उघड असते. (इतर सर्व दरवाजे बंद झालेले असतात!) या दाम्पत्याच ही तसच झाल!
दरवर्षीप्रमाणेच गणेश चतुर्थी आली.
परंपरेनुसार गणेशाची स्थापना झाली.
नित्य क्रमानुसार द्वारका बाई गणेशाची पुजा अर्चा भक्ती बेल फुल आरती सगळ दरवर्षीप्रमाणेच अखंडित सुरू होत.
गणपती वाट बघत होते. आज बोलेल! उद्या बोलेल! आज सागल! उद्या सागल! आज मागेल! उद्या मागेल! आज नवस करेल! उद्या नवस करेल! आता देव परिक्षा पाहत होता. पण द्वारका बाई पण तेवढीच हट्टी! तापट सभाव, फटकळ बोलणारी जिद्दी स्वभावाची! *ढोल्या ची लेक चौध-या ची सुन!* शेवटच्या दिवसापर्यंत काहीच बोलली नाही. उजाडला ना शेवटचा दिवस! सकाळची आरती झाली. स्वयंपाक झाला, पंगत आटोपली, संध्याकाळच्या आरतीची वेळ झाली. गणपती बाप्पा विचार करू लागले हि वेडी द्वारका बाई!
येते का नाही!
मला मागते काही!
शेवटी संध्याकाळची आरती ही झाली.
मुर्ती हलवण्याची वेळ आली !
तरूण तयारी करू लागले!
त्यांची लगबग तिकडे बैलगाडी सजून तयार! आली ना गणपतीच्या समोर द्वारका बाई! तिच ते रौद्र रुप! लाल झालेले डोळे! कंठ दाटून आलेला! नाकावर राग! गणपती बाप्पा ला घामच फुटला! आता ही बाई बोलते काय ‼ नाही काय ‼ तसेही पुराणातील अनेक उदाहरण आहेत. देव फक्त भक्ताला च घाबरतो.
गणपतीन विचार केला न ठरवल! *लेका गण्या आता मुका राय अन ऐकून घे! नाहीतर तुझी काही खैर नाही. पुंडलिकासाठी पांडूरंग विटेवर उभा राहीला! गणपती बाप्पा ले वाटल आपण मुक ही राहू शकत नाही काय!बाप्पा ने तोंडावर बोट ठेवले, शांत उभे राहले. द्वारका बाई न गणपतीच्या पायावर डोक ठेवल, दाटून आलेला कंठ आवरला, डोळ्यातले अश्रू गिळून घेतले, थोड स्वतःला सावरल पण तेवढच शांत पणे; तरी भाषा करारी अन निर्वाणीची वापरूनच; द्वारका बाई बोलली हे गणपती राया! गणपती बाप्पा हादरलेच! *आयक माय या वर्षी जसा तु आनंदात आला दहा दिवस राहून खाऊन पिऊन आनंदात चालला तसच पुढच्या वर्षी तुले आनंदात यायच दहा दिवस आनंदात राहायच खाऊन पिऊन ढेरी फुगवून नाचत वाजत गाजत जायच असल तर..... ‼ आता मात्र गणेश विचारात पडले! हे माझा रस्ता बंद करते काय ‼ पुढच्या वर्षी येऊ देते का नाही❓ बाप्पा शांत ‼ गण्या मुका बस ऐकून घे!स्वतःला च म्हणू लागले द्वारका बाई पुढे काय बोलल्या(व-हाडी भाषेत) जसा तु पुढच्या वर्षी तुया पायानेच चालत येशील तशीच मायी पोरगी तुया पाया जवळ टनटन कणकण घोड्या सारखी उड्या मारत आली पायजे! बाप्पा मनात बोलले बर ‼ जर माया पोरीचा पाय सुधा झाला, ती पायान चालत आली. लंगडी नाही, घोड्यासारखे पाय झाले तर मी तुले *चांदीचा पाय वाहील* अन आयक शिरा पोईची पंगत करीन! *हे माया नवस हाय*
आयकून घे! माय आयकल माया पोरीचा पाय सुधा केला माया नवसाले पावला त पुढच्या वर्षी ये नाहीतर मी माया घरात पाय ठेऊ देत नाही. मायी पोरगी लंगडी लंगडत लंगडत चालल, तु तिकडून उड्या मारत येशील, तुय काय करू मी, रायत घालू का? या कानान आयक का त्या कानान, तुले यायच असल, तर माया पोरीले टनटन करून ये! तुय स्वागत हाय! एवढ ऐकल की गणपती बाप्पा न सुटकेचा निश्वास टाकला! मनात बोलले सुटलो बापा एकदाच! मग बोलले एवढंच ना! हे त माझा डाव्या हाताचा खेळ आहे.तथास्तू ‼ अग द्वारके मीच करणारा! मी बिघडवणारा! मीच घडवणारा! मीच सुख कर्ता! मीच दुखः हर्ता ! माझासाठी काय ⁉ मोठी गोष्ट हाय ‼ जा आणखी काय बोलायचंय ⁉ द्वारका बाई न ऐकल्या सारख! नाही! बस माया फक्त एवढाच नवस हाय! ते पुरा कर! देवाच भक्ताच नात माय लेका सारख आरे कारे च! आपण अहो काहो नाही बोलत. देवाच भक्ताच बोलण संपल, द्वारका बाई बाजूला झाल्या तरूणानी गणरायाला उचलल; एक लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला! एक दोन तिन चार, गणपती चा जयजयकार! गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! तिकडून गणपती बाप्पा म्हणाले, अबे तुमच्या पेक्षा मले जास्त घाई आहे. पुढच्या वर्षी यायची! कारण मले माया भक्ताची पुजा अर्चा श्रध्दा भक्ती भाव, भावना विश्वास दृढ करायचा आहे. त्यासाठी तुमच्या पेक्षा मी उतावीळ आहो पुढच्या वर्षी या साठी! चला आता‼
त्या वर्षीची गणेश विसर्जन मिरवणूक आनंदात शांततेत पार पडली. बाप्पा गेले खरे पण त्याचे डोळे आणी मन इकडेच होत. भक्ताची मनोकामना पूर्ण करायची होती. दिवसे दिवस उलटत होते तसतशी पायात सुधारणा होऊ लागली. *चमत्कार* झाला‼ छोटीशी गोंडस नंदा स्वतःच्या पायावर टनटन उड्या मारू लागली ! तिला उड्या मारताना पाहून भक्त द्वारका बाई चा आनंद गगनात मावेनासा झाला. घोड्यासारखे पाय टनटन झाले.पण बोललेला नवस मनात ठेवून ती गणरायाला भजू लागली! तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. तिन ठरवल योग्य वेळ दिवस येईपर्यंत कोणालाही सांगायच नाही. ति गणरायाच्या आगमना साठी *आतुर झाली होती. तिला गणपतीची ओढ लागली होती. चातक पक्षा प्रमाणे गणेश चतुर्थी ची वाट पाहू लागली. तिला वाटू लागल कधी गणेश चतुर्थी येते कधी गणराया च आगमन होते. मी कधी त्याच्या समोर जाऊ अन आनंदान नाचू, कधी नवस फेडू! काही सुचत नव्हत. इकड नंदा ताई ठणठणीत झाल्या, सर्व सामान्य मुली प्रमाणे खेळू बागळू लागल्या. दिवसा मागून दिवस जात होते. आठवडे महीने उलठत होते पण वर्ष काही येत नव्हत ते फक्त *द्वारका बाई* साठी कारण वाट पाहली की ती वेळ दिवस काळ लवकर जात नाही.नाहीतर एरव्ही दिवस कसे निघून जातात कळत नाही. पण इथ *काळ थांबल्या सारखा झालता. कारण यावेळेस लवकर याव अस भक्ताला च नव्हे तर बाप्पा लाही वाटत होत. म्हणून काळ दोघांचीही परीक्षा घेत होता. शेवटी प्रत्येकाला मर्यादा आहेत. पाहता पाहता तो दिवस आला. *गणेश चतुर्थी* गणराया च आगमन झाल.
देवीदास पाटील व परिवारात आनंदी आनंद गगनात मावत नव्हता या वर्षीचा गणेशोत्सव काही वेगळाच‼
गणेश स्थापना झाल्यानंतर राञी द्वारका बाई आपल्या परिवारासोबत बसल्यावर परिवाराला आपण केलेला *नवस* बोलून दाखवला.
परिवारान सहर्ष स्वागत केल. आणी उद्याच *चांदीचा पाय आणून अर्पण करू अस ठरल ‼ दुसऱ्याच दिवशी चांदीचा पाय देवीदास पाटील यांनी आणला की द्वारका बाई चे मोठे पुञ डॉक्टर दत्तात्रय चौधरी यांनी आणला. माहीत नाही पण गणेश चरणी वाहल्या नंतर ही वार्ता संपुर्ण गावात वा-या च्या वेगाने पसरली. सगळ गाव पाय पहायला येऊ लागल. पाहून जाऊ लागल. द्वारका बाई पण सागू लागल्या नंदा साठी *नवस* बोलली होती.
तो पुर्ण झाला म्हणून केला.
पण पंगतीचा बेत तिने तेव्हा काही सांगीतला नाही.
ठरल्या प्रमाण दहा दिवस झाले, गणरायाला निरोप देण्याचा दिवस व वेळ आली. ठरल्या प्रमाण घरात चर्चा झाली या वर्षीचा मेनू द्वारका बाई ने सांगीतला. तो मेनू स्वयंपाकाचे वेळी पाहून स्वयंपाक करणारे गावकरी,महीला आश्चर्य चकीत झाले.
कुजबुज करू लागले त्या वेळी द्वारका बाई बोलल्या *माया नंदा साठी शिरा पोई ची पंगत नवसात बोलली होती* गावकऱ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसेल असा तो सगळा घटनाक्रम विस्तृत पणे द्वारका बाई नी वरील प्रमाणे गावकऱ्यांना सांगीतला.
पंगत आटोपली गणेश विसर्जनाची वेळ झाली. आनंदाचे क्षण दिवस जायाला वेळ लागत नाही. आरती झाली. दरवर्षीप्रमाणेच घोषणा तोच आनंद तोच उत्साह बाप्पा ला उचलल. यावेळी मात्र भक्ताची मनोकामना पूर्ण केल्याचा आनंद बाप्पाच्या चेहर्यावर ओसंडून वाहत होता. बाप्पा द्वारका बाई कडे पाहत होते. आणी द्वारका बाई बाप्पा कडे! एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू! अशाच सुख आणी दुखःत बाप्पाना निरोप दिला. बाप्पा गेले! सगळ वातावरण शांत झाल. तेव्हापासून सगळ्याच गावकऱ्यांना बाप्पा संकटमोचक वाटू लागले.सगळेच गणपतीचे भक्त झाले मनोभावे पुजा अर्चा करू लागले. संपूर्ण गाव भक्ती भाव ठेवून मनोकामना करू लागले. आपले सुख दुःख गणपती ला सागू लागले. द्वारका बाई सारखेच नवस बोलू लागले. अनेकाचे नवसाला गणपती पावू लागला. ते मोठ्या आनंदाने नवस फेडू लागले. दरम्यान चे काळात द्वारका बाई नी अनेक नवस केली. त्या नवसाला सुध्दा गणपती पावले, म्हणून गणेशोत्सवात स्थापनेपासून पहिल्यांदा गावकऱ्यांना बुंदी पुरी ची पंगत त्यावेळी देऊन नवस फेडला. बुंदी पुरीच त्याकाळी फक्त श्रीमंतांच्या लग्नात असायची असा तो काळ ‼
त्यानंतर चेहेल गावकरी वेळोवेळी नवस बोलू लागले अनेकांचे पुर्ण होऊ लागले ते फेडू ही लागले. कोणी पहीली पगार दान करू लागला. तर कोणी चांदीचे गणपती ‼ तर कोणी सोन्या च्या दुर्वा ‼ चेहेल गावक-याच पाहून नातेवाईक पण नवस बोलू लागले. त्याचे ही नवस पुर्ण झाल्याने ते फेडू लागले. मग नातेवाईक कोणी *गाव जेवण* तर कोणी *नगर भोजन* देऊ लागले.
द्वारका बाई;नंतर गावकरी;नंतर नातेवाईक; नंतर मिञ मंडळी; आप्तेष्ट इतर ही नवस बोलू लागले ते पुर्ण होऊ लागले, आणी ते फेडू लागले. भक्त नवस मोठ्या थाटात उत्साहात मोठ्या प्रमाणावर खर्च करून फेडू लागले म्हणून चेहेल चा गणपती *नवसाला पावतो अशी गावक-यासोबत नातेवाईक मिञ मंडळात भाव विश्वास दृढ झाला. श्रद्धा वाढली. भक्तांची संख्या वाढली. दहा दिवसानंतर दर महिन्याला चतुर्थी साजरी होऊ लागली. भक्त दर्शनाला येऊ लागले. संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली. यावरून हेच दिसून येत अनेकानी नवस बोलले ते बाप्पा नी ऐकले! पुर्ण ही केले,भक्तांनी मनोभावे फेडले. यावरून चेहेल चा गणपती नवसाला पावतो म्हणून गणपतीच नामकरण *नवशा गणपती* करण्यात आल.
चेहेल चा गणपती हजारो लोकांना पावला! *पण मी एकच नवस केला होता मला माञ पावला नाही*.कारण काही असेलही! फक्त माझा एक नवस अपवाद! सोडला तर; धार्मिक भक्तानी हजारो लोकांची भक्ती ! हजारो लोकांच्या भावना! हजारो लोकांची श्रध्दा! हजारो लोकांचा विश्वास! हजारो लोकांचे अनुभव! हजारो लोकांनी प्रत्यक्ष केलेले सत्य कथन ‼यावर विश्वास ठेवायचा का माझा सारख्या नतद्रष्ट; नास्तिक माणसावर ⁉ याचा निर्णय तमाम *नवशा गणपती वर अगाढ श्रद्धा व विश्वास असणा-यानी घ्यायचा आहे.*
बहुतेक भक्तांना वाचकांना हा प्रश्न पडण साहाजिकच आहे, की मी *नास्तिक* असतानादेखील होय थोडावेळ नास्तिक समजा! गणपतीवर एवढा विस्तृत लेख कसा लिहला. का लिहला. खर म्हणजे आज गेली *बारा वर्ष झाली मी नवशा गणपतीच्या दर्शनाला पण गेलो नाही.* एक प्रकारे मी गणपतीचा निंदक टिकाकार वैगेरे वैगरे काही म्हटल तरीदेखील चुकीच होणार नाही. हे प्रामाणिक पणे मान्य करतो. बर माझा सारख्या नतद्रष्ट; नास्तिक अभागी दुर्भागी व्यक्तीनी भाव ठेवला काय ⁉ नाही ठेवला काय ⁉ विश्वास असला काय ⁉ नसला काय ⁉ भक्ती केली काय ⁉ नाही केली काय ⁉ म्हणून नवशा गणपतीच्या *महत्त्व* कमी होणार ‼ *महती* कमी होणार ‼ लोकांचा *विश्वास* कमी होणार ‼का लोकांची *श्रध्दा* कमी होणार‼काहीही फरक पडणार नाही. कारण संत गजानन महाराजांचे जसे निस्सीम भक्त होते तसे त्याचे विरोधक; निदक; टिकाकार पण होते. भक्त महाराजांवर प्रेम; श्रद्धा; उपासना करायचे तर विरोधक, नास्तिक महाराजांवर टिका टिप्पणी आरोप करून बदनामी करायचे! महाराजांवर शेण फेकायचे! तसेच शिर्डी च्या साईबाबांची कहाणी! पण तरीदेखील दोघांच्याही *महतीत; कीर्तीत* तसूभर पण फरक पडला नाही. कमी झाली नाही. महाराजांची जसी त्याच्या भक्तावर कृपा होती तशीच त्याच्या विरोधक, टिकाकार, निंदक यांचाही महाराजांनी उद्दारच केला! *तसाच उद्दार नवशा गणपती माझा ही करेल*! कारण मी नवशा गणपती चा जरी भक्त नसलो, म्हणून काय झाल‼ *त्याच्या बापाचा फार मोठा कट्टर निस्सीम भक्त आहे.* म्हणजेच देवो के देव *महादेव भोलेनाथ शिव शंकराचा* ‼म्हणून नवशा गणपतीवर माझी श्रध्दा नसली; म्हणून काय झाल‼ *बाप्पा वर नाही पण बापावर तर आहे* ‼ म्हणून बाप्पा माझावर *वक्र दृष्टी* ठेऊ शकत नाही.कारण *बापसे बेटा; बडा हो नही सकता*‼ *बाप तो बाप रहेगा*‼
वरील हे जे मी लिखाण केल, कथन केल, ते माझा मनाच काही नाही; जे काही असेल ते ज्याना ज्याना अनुभव आले; गणपती बाप्पा नवसाला पावले; प्रचिती आली. मनोकामना पूर्ण झाल्यावर लोकांच्या तोडून ऐकून आपल्या समोर ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. जे काही चांगल लिहिल ती गणपतीची कृपा !आशीर्वाद !आदेश !संकेत! कारण गणपती ही *रिद्धी सिध्दी* ची देवता *बुद्धीची* देवता म्हणून त्यानेच माझा तोडून वदवून घेऊन लिहून घ्यायच असेल तर काय सांगाव‼ कारण गेली मंगळवार पासून आज चार दिवस झाले मला ताप आहे. मी तापाने फणफणत असतानादेखील; अंथरूणावर पडलेला असून देखील; हा लेख प्रपंच माझा हातून लिहून घेतला. मला लिहिण्यास भाग पाडले! मला लिहण्याची सद्बुद्धी दिली. अंथरूणावर पडलेल्या वेळेचा सदुपयोग करायला लावला; याला काय म्हणायच ⁉ कृपादृष्टी ‼ आशीर्वाद ‼प्रसाद ‼ की चमत्कार ‼ माझा तर आकलना बाहेरच आहे!
वाचकानो ; भक्तानी ; आपणही जे जे चांगल;ते ते नवशा गणपतीची कृपा! आणी जे काही वेडे वाकडे चुकीचे शब्द,वाक्य असतील ते माझे पामराचे? समजून पदरात घ्यावे! माऊली म्हणतात तस "करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिध्द!" जे जे चांगले ते घ्यावे! वाईट सोडून द्यावे! हे सगळ *नवशा गणपती भगवंत चरणी अर्पण करतो. माझ्या वाणी ला पुर्ण विराम देतो.🚩🙏 नवशा गणपती भगवंत की जय 🙏🚩
अण्णाभाऊ गोवर्धन चौधरी पाटील
चेहेल मंगरूळनाथ वाशिम.
0 Comments