Ticker

6/recent/ticker-posts

*"पेंढारकर" च्या निलेश नी, "लंके" चा निलेश व्हावे!*

  


होय हिच वेळ आहे! हिच संधी आहे! आर पार ची *लढाई* आहे! *स्वाभिमानाचा* प्रश्न आहे! *अभी नही तो कभी नही! अबकी बार!! आर पार*..............

होऊ घातलेल्या विधान सभा निवडणूकीत वाशिम मंगरूळनाथ विधान सभा मतदार संघात घमासान पाहायला मिळणार आहे.विधान सभेची आचार संहिता लागण्यास अवधी असताना आतापासून च पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. निवडणूक लढण्यास इच्छुक अस असलेले डझन दोन डझन उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. इच्छुकामधून कोणाला उमेदवारी मिळते व उमेदवारी मिळाल्या मधून कोण *जायंट किलर* ठरतो हे पाहण *औत्सुक्याच* ठरणार आहे. सध्या इच्छुकांमध्ये अनेक नवख्या, उप-या, सोबतच *जुने जाणते*, *दलबदलु* उमेदवाराचा भरणा दिसत आहे. प्रमुख उमेदवाराचा विचार केल्यास मागच्या विधानसभेला एका माजी *राज्यमंत्री याच्या आशीर्वादाने पराभव होता होता आमदारकीची लॉटरी लागलेले विद्यमान आमदार लखन मालीक*; तर मुस्लिम व दलित मतदाराच्या जोरावर 52000/ मताचा टप्पा ओलांडून विजया दरवाजा ठोठावणारे *डॉ. सिध्दार्थ देवळे*; तर शिवसैनिक, जनतेचे उमेदवार असलेले जनतेच प्रेम व आशीर्वाद याचे जोरावर 46000/  मताची मजल मारणारे *निलेश पेंढारकर* हे या निवडणुकीत पुन्हा एकदा आपल नशीब आजमावून पाहण्यास सज्ज आहेत. यातील विद्यमान आमदार हे भारतीय जनता पक्षाचे असून ते आपल्या पक्षात इच्छुकामधून आघाडीवर असल्याचे असल्याचे वरकरणी तरी दिसत आहेत. 

                    तर दुसरे वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवून क्रमांक दोन पर्यत मजल मारणारे *डॉ. सिध्दार्थ देवळे हे यावेळेस वंचितचा राजीनामा देऊन उबाठा कडून लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे.* तर तिसरे 2014 मध्ये भाजप सेना युती तुटल्या नंतर शिवसेनेची अगदी वेळेवर उमेदवारी मिळून ही केवळ 1250 / मतांनी पराभव झालेले *निलेश पेंढारकर हे  या वेळेस उबाठा कडून प्रबळ दावेदार होते! पण दुर्देव*!!!....................  

2014 मध्ये  ऐनवेळेवर कोणी उमेदवारी घेण्यास तयार नसतांना *खासदार* याच्या जबाबदारी वर उमेदवारी मिळाली ती निलेश पेंढारकर यांनी समर्थ पणे निभावतात  क्रमांक दोन पर्यत मजल मारली. त्यानंतर 2019 ला पुन्हा भाजप सेना युती झाली असता शिव सैनिक व जनतेच्या रेट्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढली व पुन्हा एकदा कडवी झुंज देऊन जनतेचे प्रेम जिंकण्यात यशस्वी झालेत. भलेही विजयी होऊन आमदार झाले नाही. पण तेव्हा पासून शिव सैनिक व जनता त्यांना *भावी आमदार* म्हणून संबोधतात! नव्हे त्याच्यात सर्वसामान्यांचा आमदार पाहतात. म्हणून यावेळेस वाशिम मंगरूळनाथ विधान सभा मतदार संघातून उबाठा ची उमेदवारी निलेश पेंढारकर याना मिळाल्यास वाशिम मंगरूळनाथ विधान सभा मतदार संघावर निलेश पेंढारकर याचे रूपाने उबाठाला एक आमदार व वाशिम मंगरूळनाथ विधान सभेवर उबाठाचा झेंडा डौलाने फडकू शकतो. 

पण दुर्दैव!!!!...............................

बाळासाहेबांच्या या लढवय्या शिव सैनिकाला उमेदवारी साठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. वणवण भटकत फिराव लागत आहे. पायपीट करावी लागत आहे. विनवणी करावी लागत आहे. पण उमेदवारी मिळणे कठीण दिसत आहे. याच सर्वात मोठ कारण! राजकीय *गॉडफादर* नसणे! जे मागील दोन निवडणुकीत *खासदार भावना गवळी याच्या सारखा साम दाम दंड भेद असलेला सर्वगुणसंपन्न असा *गॉडफादर* असल्यामुळे उमेदवारी सहज मिळाली, शिवाय आर्थिक मदत सुध्दा!!! त्यानंतर  दुस-या निवडणूकीत सुध्दा उमेदवारी न मिळता ही खासदार याचे भरोश्यावर *अपक्ष* निवडणूक लढण्याच धाडस पेंढारकर करू शकले!  पण आज 2024 ला  यावेळेस त्याना बहीण मानलेल्या खासदाराला सोडून निष्ठावंत पणाला जागून उबाठात कायम राहिलेल्या निलेश पेंढारकर याना कोणीही *गॉडफादर* राहीला नसल्याचे त्याच्या झालेल्या परिस्थिती व हतबलतेवरून स्पष्ट दिसत आहे. कारण जिल्ह्यातील एकही वरिष्ठ पदाधिकारी व तालुका स्तरीय, उपतालुका प्रमुख,व काही सर्कल प्रमुख यानी निलेश पेंढारकर यांची साथ सोडून लक्ष्मी दर्शनाच्या लालचीने उप-याच समर्थन करताना दिसत आहे. यामध्ये प्रामुख्याने *उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे याचे विचाराचे नवसैनिका चा भरणा जास्त आहे*. पण मतदार संघात कानोसा घेतला असता, *बाळासाहेबांना मानणारा व बाळासाहेबा च्या विचाराचा शिव सैनिक निलेश पेंढारकर याचे पाठीशी खंबीर व ठामपणे उभा असल्याचा दिसत आहे*.त्यातील काही सोशल मिडीयावर व्यक्त होत असून, त्यांना रोज आवरण्यासाठी वरिष्ठ व पदाधिकारी याना पोस्ट टाकून भावनिक आवाहन करून आवरताना दमछाक होत आहे. पण बाळासाहेबांना मानणारा शिव सैनिक रोज व्यक्त होत आहे. तो निलेश पेंढारकर याच्याशिवाय उप-या ला स्वीकारण्याच्या मनस्थितीत सध्यातरी दिसत नाही. पण प्रचंड मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन झाल्यास अनेकांना मोह आवरता येणार नसला तरी पदाधिकारी वगळता कार्यकर्ते व  बाळासाहेबांचा शिव सैनिक माञ काय करेल ‼ हे सध्या तरी सांगणे कठीण आहे. 

पण दोन वेळा विधान सभेत शिव सेनेचा किल्ला लढविणारे बाळासाहेब याच्या कडवट कट्टर लढवय्या शिव सैनिक असलेल्या निलेश पेंढारकर यांनी हार न मानता, मनोधर्य खचू न देता परिस्थितीचा सामना करण्यासाठी हिंदु ह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब याचा कडवट कट्टर हाडाचा शिव सैनिक असलेल्या अहिल्या नगर (अहमदनगर) जिल्ह्यातील माजी जि.प.सदस्य, माजी आमदार, विद्यमान खासदार निलेश लंके याचा आदर्श घेण्यास काही हरकत नाही. 

                     अहिल्याबाई होळकर नगर (अहमदनगर) जिल्ह्यातील निलेश लंके हे असेच शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब याचे विचाराने प्रेरित झालेला,कडवट कट्टर लढवय्या शिव सैनिक शिव सेनेच्या शाखाप्रमुख पासून राजकीय जिवनाला सुरवात करणारा नंतर तालुका प्रमुख, शिव सेनेचा जि. प. सदस्य, असा प्रवास सुरु असताना कामाचा झपाटा पाहून जनतेने त्याना विधान सभा लढावी म्हणून आग्रह धरला! जनतेला त्याच्यात आमदार दिसत होता. पण वरिष्ठांना माञ सर्व सामान्य निलेश लंके *गॉडफादर* नसलेला, अत्यंत गरीब परिस्थिती असलेला पण प्रचंड *जनाधार* असलेला निलेश लंके *इलेक्टीव मेरिट* दिसत नव्हता. म्हणून पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी निलेश लंके याना पारनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली नाही. म्हणून निलेश लंके यांनी हार मानली नाही. धिर सोडला नाही. मनोधर्य खचू दिल नाही. निराश झाले नाही. त्यांनी आशा सोडली  नाही. जनतेचा प्रचंड रेटा होता. जनता पाठीशी आहे. हे लक्षात आल्यावर निलेश लंके यांनी विधान सभा लढण्यावर ठाम राहीले. 

आणी हेच अजित पवार यांनी हेरल व त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली. 

व *निलेश लंके विधान सभा निवडणूकीत प्रचंड मताधिक्य घेऊन विजयी झाले*. मग मिळालेल्या आमदारकीच्या माध्यमातून झपाटलेल्या अवलिया सारख काम करत संधीच सोन केल. त्यांच आमदारकी च काम पाहून 2024 च्या लोकसभेत शरद पवार यांनी अजित पवार याची साथ सोडून आल्यावर लोकसभेची उमेदवारी दिली. आणी निलेश लंके लोकसभेवर ही निवडून गेले. 

आज ते अहिल्याबाई नगर (अहमदनगर)  लोकसभा मतदारसंघाच प्रतिनिधित्व करत आहेत. 

त्यानी विधान सभेला शिव सेनेन उमेदवारी दिली नाही म्हणून *निष्ठावंत! निष्ठावंत!* जप करत बसले असते. तर निष्ठेची फक्त विष्ठा झाली असती. आणी तिचा घाण वास सुटला असता. आणी त्या घाण वासामुळे सगळी जवळची माणस दुर पळाली असती, पण निलेश लंके निष्ठेची माळ जपत बसले नाही. उध्दव ठाकरे यांनी उमेदवारी नाकारली म्हणून पक्ष बदलणारच नाही. अशी भुमीका घेतली नाही. तर कडवट कट्टर शिव सैनिक असलेल्या निलेश लंके यांनी *अत्यंत विरोधी विचार सरणी असलेल्या राष्ट्रवादीची* उमेदवारी घेऊन आमदार झाले. त्यानंतर राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवार याचे सोबत गेलेल्या निलेश लंके यांनी लोकसभेच्या तोंडावर शरद पवार गटात जाऊन लोकसभा लढवली. अन खासदार झाले. त्यानी *वेळोवेळी पक्ष बदलला*, *वेळोवेळी निष्ठा बदलली*. त्यांना माहीत होत निष्ठा फक्त *कार्यकर्ता* म्हणूनच राहू देते. *आमदार खासदार* होऊ देत नाही. ज्या निलेश लंकेला उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेची उमेदवारी नाकारली त्याच उध्दव ठाकरे यांनी आमदार म्हणून निवडून आल्यावर *मातोश्रीवर* बोलावून सत्कार केला.  आणी उध्दव ठाकरे यांनी हेच सिध्द केल *राजकारण निष्ठेला नव्हे विजयाला मुजरा करते.* 

                     असे अनेक उदाहरण देता येईल. ज्यांना *उध्दव ठाकरे यांनी उमेदवारी नाकारली पण त्यानी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली व ते विजयी झाल्यानंतर पुन्हा त्याना शिव सेनेची उमेदवारी दिली*. उदाहरण सांगायच भंडारा विधानसभेचे *आमदार भोंडे*, उमेदवारी नाकारल्यावर 2014  अपक्ष निवडणूक लढवून आमदार झाले, 2019 त्याना उध्दव ठाकरे यांनी उमेदवारी दिली. रामटेक च्या *आशीष जयस्वाल* याचं तेच! मुक्ताईनगर च्या *चंद्रकात पाटील* याना उध्दव ठाकरे उमेदवारी न दिल्यामुळेच अपक्ष निवडणूक लढवावी लागली व आमदार व्हाव लागल! परतूर च्या *सुरेश जेथलिया* याना ही उध्दव ठाकरे उमेदवारी नाकारली मग तेही अपक्ष निवडणूक लढवून आमदार झालेत. संभाजीनगर च्या एका मतदार संघातून *प्रदीप जैस्वाल* याना उध्दव ठाकरे यांनी उमेदवारी नाकारली नंतर त्यांनी पण अपक्ष निवडणूक लढवली व विजयी झाले. अमरावती जिल्ह्य़ातील मोर्शी मतदार संघात *अनिल बोंडे* याना उध्दव ठाकरे यांनी उमेदवारी नाकारली ते ही अपक्ष निवडणूक लढवून आमदार झालेत. अचलपूर चे *ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू* यांनाही उध्दव ठाकरे यानी 1999 ला उमेदवारी नाकारली पण ते देखील अपक्ष निवडणूक लढवून आमदार झाले. गेली चार टर्म ते अपक्ष आमदार आहेत. *अमोल कोल्हे* हे शिव सेनेत होते त्यानी ही राष्ट्रवादी कडून निवडणूक लढवली दुस-यादा खासदार झालेत. असे डाल्यान उदाहरण देता येईल. ज्यांना उध्दव ठाकरे यांनी उमेदवारी नाकारली म्हणून त्याचा राजकीय प्रवास त्यांनी थांबविला नाही. चालत राहीले, म्हणून आज ते त्याच्या *ध्येयापर्यंत* पोहचले! *निष्ठा निष्ठा* करत थांबले असते तर *संपले* असते. राजकीय सारीपाटावरून *बाद* झाले असते. 

म्हणून राजकारणात पाऊल ठेवल्यावर थांबायच नसत! चालत राहायच असत. मार्ग सापडत असतो. *ध्येय* ही गाठता येते. म्हणून *धाडस* दाखवाव! *हिम्मत* करावी! ठाम *भुमिका* घ्यावी!निर्णायक *लढाई* लढावी!म्हणून जनमताचा आदर करून,   *होऊन जाऊ दयाव! दुध का दुध, पाणी का पाणी!!*

                         म्हणून वरील शिव सैनिकाचा (होय होय कडवट,कट्टर,निष्ठावंत) दलबदलु! व अपक्ष निवडणूक लढवण्याचा!    आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाशिम मंगरूळनाथ मतदार संघातील *पेंढारकर च्या निलेश* नी *नगरच्या लंके चा निलेश* व्हाव!  कारण *जो जिता वही सिकंदर*! *मरने वालो को अरबी संमदर*! विधान सभेत निष्ठेला नाही! आमदारांना च प्रवेश मिळतो!  तूर्तास एवढेच!!

       *अण्णाभाऊ गोवर्धन चौधरी चेहेल मंगरूळनाथ वाशिम*

Post a Comment

0 Comments