आज *निलेश पेंढारकर* याच्या मागे *हिंदु ह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे* याचीच कृपा व आशीर्वाद आहे.तसेच पक्ष प्रमुख *उध्दव ठाकरे हेच निलेश पेंढारकर याना न्याय देऊ शकतात*.
कारण हिंदु ह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब याना मानणारा व त्याचे विचारावर चालणारा शिव सैनिक हा निलेश पेंढारकर याचे सोबत आहे. निलेश पेंढारकर याचे साठी जिव तोडत आहे. निलेश पेंढारकर याना उमेदवारी मिळावी म्हणून आपापल्या श्रद्धा व दैवताला साकडे घालत आहे. प्रार्थना करत आहे. 2014 व 2019 ला निलेश पेंढारकर याचा प्रचार केलेला शिव सैनिक निलेश पेंढारकर याचा थोडक्यात झालेला पराभव पचवू शकला नाही. त्याला त्याची खंत व दुखः आहे. त्याला *निलेश पेंढारकर सारखा दांडगा जनसंपर्क असलेला, साधी राहणी उच्च विचारसरणी असलेला, मनमिळाऊ, व्यापक जनसंपर्क, हसतमुख व्यक्तिमत्त्व, सर्वांना आपला वाटणारा, अत्यंत भोळ्या मनाचा माणूस, नेते पण नसलेला, आपल्यातला कार्यकर्ता वाटतो*.
ज्यानी ही पोस्ट तयार केली, त्याला खरोखरच धन्यवाद! कारण आजच्या परिस्थितीत निलेश पेंढारकर याच्या पाठीशी हे *दोनच हस्ती आहेत. आणी त्या व्यतिरिक्त फक्त आणी फक्त शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब याना मानणारा शिव सैनिक! होय होय फक्त आणी फक्त हिंदु ह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब याना मानणारा व विचारावर चालणारा शिव सैनिक! कारण उबाठा च्या निर्मिती नंतर उबाठात आलेले सैनिक हे हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब याचे शिव सैनिकच नाहीत. ते फक्त हिंदुत्व विरोधी विचाराचे महाविकास आघाडी समर्थक आहेत. त्याना हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब काय कळणार ⁉ आणी निलेश पेंढारकर सुध्दा‼ शिव सैनिकानो खर म्हणजे हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब याची शिव सेनाच राहिली नाही. हे वास्तव आहे.सत्य आहे म्हणूनच मी शिव सेना सोडण्याचा निर्णय घेतला! हा निर्णय किती योग्य होता हे लोकसभेत उबाठा ने उपरा उमेदवार देऊन अर्धा खरा ठरवला! मला शिव सेना सोडण्याच अजिबात दुःख नाही! पण जर *निलेश पेंढारकर याना पक्षान उमेदवारी दिली तर पक्ष निष्ठावंत, कडवट कट्टर शिव सैनिकाची कदर, मान व योग्य सन्मान करतो! हे सिद्ध होईल. यावर शिक्कामोर्तब होईल*! मग *मी शिव सेना सोडल्याच खरोखरच दुःख होईल. अन्यथा नाही. कारण जर पक्ष फक्त धनाढ्य, श्रीमंत, इलेक्टीव मेरिट पाहूनच उमेदवारी देणार असेल तर! होय तर मग शिव सेनेत वर्षानुवर्ष काम कशासाठी करायच? घर दार सोडून, घरावर तुळशीपत्र ठेवून पक्षांसाठी वाहून कशासाठी घ्यायच? कडवट,कट्टर, निष्ठावंत याच काय लोणच घालायच काय ⁉ त्या पेक्षा नोकरी करायची! व्यवसाय करायचा! भ्रष्टाचार करायचा! डॉक्टरी वकीली करायची! क्लायंट्स ला, पेशंटला लुटायच! वारेमाप पैसा कमावून संपती जमवायची, ते पैसा खर्च करून मिञ मंडळी गोळा करायची! पैसे देऊन प्रसिध्दी मिळवायची! पैशान पञकार, संपादक, वर्तमान पत्र मालक विकत घ्यायचे, प्रसिद्धी व प्रचार करायचा! वर पर्यंत लॉबीग करून आपल्याला वाटेल त्या पक्षासोबत जायच! त्यात प्रवेश करायचा, अन उमेदवारी मिळवायची! अन आमदार खासदार व्हायच! हेच जर होणार असेल तर मग निष्ठावंताच काय ⁉ त्यानी काय करायचं ⁉ ती एक मण आहे *हेच का फळ मम तपाला* *शिव सैनिकानो खर बोलण्याचा राग येऊ देऊ नका पण‼ वाशिम मंगरूळनाथ विधान सभेचे उबाठाची उमेदवारी डॉ. देवळे ना नक्की झाली आहे! फक्त घोषणा ती काय तेवढी बाकी आहे. यात बदल होण्याची शक्यता फार कमी आहे.पण म्हणून हार मानण्याची गरज नाही. हार मानून घरी स्वस्थ बसून चालणार नाही*.
*क्यो की कोशिश करणे वाले की कभी हार नही होती!* हे ही सत्य आहे.
*याच जिवंत आणी आम्ही पाहीलेल, अनुभवलेल ! सत्य उदाहरण सांगायच तर वर्ष 1999 ची मंगरूळनाथ विधान सभा निवडणूक 1995 ते 1999 युतीचे सरकार होते. त्या सरकारला काही आमदार कमी पडत असल्यामुळे त्या वेळेस अपक्ष म्हणून निवडून आलेले गजाधर राठोड यानी युती सरकार ला पाठींबा दिला. त्या बदल्यात त्याचे पुञाला युती सरकार नी म.रा.वि. मंडळाचे सदस्य केले व राज्यमंञी दर्जा दिला. मग त्यानी 1999 च्या विधान सभा निवडणूकीत शिव सेनेची उमेदवारी मागीतली. विद्यमान आमदार असल्यामुळे पक्षातील मुंबईच्या नेत्याना हे पटल, खर वाटल! मग काय* ‼ *भिमराव पाटील व कडवट कट्टर शिव सैनिकाचे स्थानिक विरोधकांनी सुध्दा याला हातभार लावला. मग काय ‼ आमदार पिता पुञ मातोश्रीवर जाऊन बसले व उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झालेत*. *आजच्या सारखेच त्या वेळचे शिव सेनेचे दोन वेळेचे जि. प.सदस्य धडाडीचे नेते भिमराव पाटील यांच्यासाठी आस लावून बसलेले, प्रयत्न करणारे सर्व शिव सैनिक सामान्य माणूस प्रचंड विरोध राग असंतोष खदखद वैगरे वैगरे सगळा प्रकार झाला पण आम्ही हिम्मत हारली नाही. शेवटच्या दिवसापर्यंत लढा सुरू ठेवला! त्या काळी तर आजच्या सारखा सोशल मिडीया नव्हता, मोबाईल नव्हते पण तरीही आम्ही सर्व शिव सैनिकानी इथ मंगरूळनाथ तालुक्यातील व शहरातील सगळ्यांनी चळवळ सुरू ठेवली. अभियान सुरू ठेवले, मतदार संघात वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी झालो. आणी हे सगळे मुंबई ला मातोश्रीवर कस पोहचेल याची व्यवस्था व काळजी घेत* *राहीलो.दररोज वर्तमान पत्रात बातमी*
*प्रसिद्ध कशी होईल, ते मातोश्रीवर कशी पोहचेल! याची व्यवस्था करण्यात आली. सगळे अपडेट मातोश्रीवर पोहचण्याची खबरदारी घेण्यात येत होती. वर्तमान पत्र, लॅन्डलाईन फोन, पेजर वैगेरे माध्यमातून मातोश्रीवर जनरेटा, जन आक्रोश, शिव सैनिक व मतदार याच्या भावना पोहचत राहीलो. उप-याला उमेदवारी मिळू नये, निष्ठावंतालाच मिळावी यासाठी जे जे करता येईल ते ते केल! आणी बंधुनो या सगळ्या आटापिटा, प्रयत्न, चळवळ, याला यश आल! आणी त्यावेळेसचे विद्यमान आमदार गजाधरजी राठोड याचे पुञ अनिल राठोड याना देण्यात आलेली उमेदवारीच नव्हे तर ए बी फार्म रद्द करून शेवटच्या दिवशी 10 वाजता भिमराव पाटील याना उमेदवारी मिळाली. आता 10 वाजता उमेदवारी व ए बी फार्म मिळाला. मग शेवटचा दिवस उमेदवारी दाखल करायचा, 3 वाजता ची वेळ* !
अर्ज दाखल करायचा कसा ⁉
शिव सैनिकानो चित्रपटा सारखी कहाणी आहे.
तिकडून फोन आला आम्ही ए बी फार्म घेऊन मुंबई वरून निघत आहोत.
तुम्ही संभाजीनगर ला चारचाकी गाडी घेऊन तयार रहा.
मग काय भिमराव पाटील, किशोर देशमुख, पांडुरंग कोठाडे हे मावळे मुंबई वरून विमानाने संभाजीनगरला येईल पर्यंत इकडून आमच्या मंगरूळनाथ चे मठावर राहणारे गायकवाड बंधू क्रुझर गाडी घेऊन 12 पर्यंत तिथे हजर!
12 ला तिथून परत 2.45 ला मंगरूळनाथ तहसील कार्यालयासमोर! इकडे माहोल तयार होता. हे लिहिताना अंगावर रोमांच व डोळ्यात अश्रू येत आहेत. हजारो शिव सैनिक व जनतेने भिमराव पाटील व त्या दोन मावळ्यांना पाहताच अश्रू अनावर झाले! कित्येक ढाय मोकळून रडले!
अनेकांनी हंबरडा फोडून आनंद व्यक्त केला. शिव सैनिकानो हे सगळं लिहत असताना, तुम्हाला सांगताना माझ्या ही अश्रू चा बाध फुटलेला आहे. अश्रू वाहत आहेत. थांबत नाहीत. पण अश्रू गिळून मी हे सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहो. कारण मी या सर्व घटनेचा स्वतः साक्षीदार आहे.
आपण या घटनेच्या इतर साक्षीदारांना विचारू शकता. आज भिमराव पाटील ह्यात नाहीत,नाहीतर त्यानीच हे सगळं आपल्याला सांगीतल असत! शिव सैनिक व सर्व सामान्य माणसाचा आनंद गगनात मावत नव्हता. भिमराव पाटील व काही मोजके महत्वाचे पदाधिकारी 2 वाजून 50 पन्नास मिनिटानी आत गेले व हजारो च्या साक्षीनी उमेदवारी दाखल केली.
भिमराव पाटील निवडून येणार असच वातावरण व परिस्थिती व जनमत होत, पण त्या वेळेस लोकसभेच्या उमेदवार असलेल्या भावना गवळी यांनी धोकबाजी केली, विश्वासघात केला! त्याना या मतदारसंघातून आघाडी मिळाली पण भिमराव पाटील याना मते कमी पडली. तसेच जे युती ला पाठींबा देणारे सहयोगी आमदार होते ते व त्याचे पुञ अनिल राठोड ये शिव सेनेची उमेदवारी मागण्यात समोर होते नव्हे उमेदवारी मिळवण्यात यशस्वी सुध्दा झाले होते. पण त्यानी सुध्दा नंतर शिव सेनेचा प्रचार ही केला नाही आणी मतदान पण नाही.
याचा परिणाम भिमराव पाटील याचा पराभव होण्यात झाला. नाहीतर मंगरूळनाथ विधान सभेवर भगवा फडकून भिमराव पाटील शिव सेनेचे पहीले आमदार झाले असते. पण धोकेबाजी, गद्दारी, विश्वासघात यामुळे शिव सैनिक मंगरूळनाथ विधान सभेत पहील्या आमदार ला मुखले!
हा इतिहास झाला. शिव सैनिकानो हे सगळं सांगायच तात्पर्य एवढच की गेलेली उमेदवारी परत कशी आणली! आणता येईल! आणायची! हाच हेतु! यासाठीच हा लेख प्रपंच!
म्हणून हिम्मत हारू नका! खचून जाऊ नका! आशा सोडू नका! प्रयत्न सोडू नका! धिर पण सोडू नका!
गाफील ही राहू नका! कारण राञ वै-याची आहे! एक नव्हे अनेक वैरी आहेत. आणी ते अत्यंत ताकदवर, शक्तीशाली आहेत.
म्हणून सोशल मिडीयावर सक्रिय व्हा! व्यक्त व्हा! पोस्ट टाकत रहा! अभियान सुरू ठेवा!
आणी सगळं हिंदु ह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब याचे शिव सैनिकाना कराव लागणार आहे. आणी तुम्ही हे करू शकता!
शिव सैनिकात ती धमक व रग आहे.
कोणताही स्थानिक पदाधिकारी,नेता तुम्हाला सहकार्य करणाराच नाही.
कारण सगळे लक्ष्मी दर्शनाने प्रसन्न झालेले आहेत.
सगळे आपापल्या डावावर आहेत.
आपला स्वार्थ पाहत आहेत.
पुढील राजकारण डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत आहेत.
ते आपल्या सोईनुसार पावल टाकत आहेत. भुमीका घेत आहेत.
नाव पुढे करत आहेत.
पण शिव सैनिक हो तुमच काय ‼
परका उमेदवार निवडून देऊन तुम्हाला काय मिळणार ⁉
तुमचा काय स्वार्थ ⁉
तुमचे कोणते नंबर दोनचे धंदे आहेत ⁉
तुम्हाला कोणती ठेकेदारी करायची आहे ⁉
तुम्हाला कोणत्या बदल्या, प्रमोशन पाहीजे ⁉
अहो सर्व सामान्य माणूस व शिव सैनिक फक्त याचे मामुली समस्या व प्रश्न असतात ‼बाकी काय ‼
म्हणून शिव सैनिकानो लागा तयारीला! लागा कामाला!
सुरू करा मिशन!
कारण निलेश पेंढारकर ची मदार फक्त शिव सैनिकांवर च आहे.
तुम्हाला कोणीही सहकार्य करणाराच नाही.
म्हणून हे तुम्हा शिव सैनिकाच कराव लागेल!
आणी तुम्ही हे करू शकता!
सकारात्मक विचार करा!
सकारात्मक दृष्टिकोन ठेवा!
कशी मिळत नाही!
मिळवल्या शिवाय राहणार नाही!
अशी ठाम भुमिका घ्या!
असा प्रण करा!
आपापल कुलदैवत!
आपापली श्रद्धास्थान आपल्याला यश नक्कीच देईल!
अशी आशा, खाञी सुध्दा आहे!
आणी मी सुध्दा आपल्या मागणीचा विचार होऊन आपल्याला यश येवो.
आपल्या भावनांची कदर होवो.
आपल्या कडवट कट्टर व निष्ठावंत पणाचा मान सन्मान राखल्या जावो!
व निलेश पेंढारकर याना उमेदवारी मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
आपली रजा घेतो!
जय जिजाऊ! जय शिवराय!!
अण्णाभाऊ चौधरी
चेहेल, मंगरूळनाथ,
वाशीम
0 Comments