Ticker

6/recent/ticker-posts

*डॉ. देवळे यांनी घेतली शिव सेनेची हाती मशाल*

 वं


चित बहुजन आघाडीचे माजी पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ देवळे यांनी मुंबई येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात घेतला प्रवेश.

# इतर पक्षातील अनेक इच्छूक उमेदवारांचे धाबे दणाणले.

वाशीम -  जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसापासून चर्चित असलेला पक्ष प्रवेश आज झाला. वंचित बहुजन आघाडीचे माजी पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांचा  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये दिनांक 20 ऑक्टोबर रोजी दुपारी मुंबई येथे मातोश्री मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला.

या प्रसंगी वाशिम जिल्हा संपर्कप्रमुख अरविंद सावंत यांनी डॉ. सिद्धार्थ देवळे यांना शिवबंधन बांधले, यावेळी वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश मापारी, विधानसभा संपर्कप्रमुख सुधीर कवर, कॅप्टन प्रशांत सुर्वे, नितीन मडके, नागोराव ठेंगडे यांच्यासह हजारो शिवसैनिकांची उपस्थिती होती. 

डॉ.सिद्धार्थ देवळे यांच्या पक्ष प्रवेशानंतर  "वाशिम जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला"  या घोषणांनी मातोश्रीचा परिसर दुमदुमून गेला होता.

डॉ. सिद्धार्थ देवळे हे वाशिम जिल्ह्यातील वैद्यकीय व्यवसायातील मोठे प्रस्थ होत, ते गेल्या १५ वर्षापासून या वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून गोरगरीबांची  सेवा करीत आहेत. तथा त्यांनी 2019 ची वाशिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लढली होती.  तेंव्हा ते 52 हजार मत  घेऊन दोन नंबर वर राहिले होते. त्यावेळ पासून डॉक्टर देवळे यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू ठेवली.


या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीतील आपल्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासूनच जिल्ह्यातील  राजकीय वर्तुळामध्ये डॉक्टर देवळे हे कोणत्या पक्षात प्रवेश करतील याची उत्सुकता मतदारांना होती. ती उत्सुकता आज संपली.  डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांना वाशिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. डॉक्टर देवळे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रवेशाने इतर पक्षातील अनेक इच्छुक उमेदवार यांचे धाबे दणाणले आहे.

Post a Comment

0 Comments