Ticker

6/recent/ticker-posts

*डॉ सिद्धार्थ देवळे यांचें महाविकास आघाडी कडून तिकीट जाहीर*


वाशिम आगामी काळात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे.गेल्या अनेक दिवसापासून वाशिम मंगरूळपीर विधानसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार कोण?असा प्रश्न निर्माण झाला होता.किंवा वाशीम मंगरूळपीर विधानसभेची जागा कोणत्या पक्षाला सुटते याची देखील चर्चा होताना दिसत होती.मात्र अखेर ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटली असल्यामुळे या मतदारसंघातून वाशिम शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ तथा समाजसेवी व्यक्तीमत्त्व डॉ.सिद्धार्थ देवळे यांनी नुकताच मुंबई येथे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधून हातात मशाल घेतली होती.अखेर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने दिनांक 23 ऑक्टोबर रोजी 65 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये डॉ.सिद्धार्थ देवळे यांचे देखील नाव घोषित केले आहे. डॉ. सिद्धार्थ देवळे यांची महाविकास आघाडी कडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यामुळे वाशिम मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यात व जनतेत उत्साहाचे वातावरण आहे. 

Post a Comment

0 Comments