Ticker

6/recent/ticker-posts

*सवाल दस करोड का‼️*




*दहा करोड मध्ये कारंजा त तुतारी वाजणार ‼️*


*महाविकास आघाडी कडून निवडून आलेले खासदार सेटीग करणार* ‼️


*पाटणी पुञ तुतारी फूकणार*‼️


*भाजपाने उमेदवारी नाकारण्या अगोदर च तुतारी साठी! गाठी भेटी*‼️


*विधान सभा निवडणूकीत उमेदवारी दाखल करण्यासाठी तिन दिवस उरले आहेत.*

*जवळपास सर्वच पक्षाच्या उमेदवाराच्या पहील्या याद्या जाहीर झाल्या आहेत.*

*सर्व प्रथम उमेदवार यादी जाहीर करून भाजप ने आघाडी घेतली अस म्हटल तर वावग ठरणार नाही.*

* *भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या पहील्या यादीत कारजाचे दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी याच्या सुपुञाचे नाव नसल्याने पाटणी पुञ कमालीचे नाराज झाले असून, त्यानी वा-याची दिशा ओळखून तुतारी कडे आपले पावले टाकायला सुरुवात केली आहे*


*त्याच अनुषंगाने ज्ञायक पाटणी यांनी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिव सेनेचे खासदार संजय देशमुख याचे सोबत सविस्तर चर्चा झाली.*


*संजय देशमुख यांनी नेमकी हीच बाब हेरून पाटणी पुञाला गळाला लावले आहे.*


*अकरा वर्ष ज्याचे वडील शिवसेनेचे आमदार होते तर गेली दहा वर्ष भाजपचे आमदार राहीले, समाजाच अत्यल्प मतदान असताना शिवसेना व भारतीय जनता पक्षाने दोन दोन वेळा उमेदवारी देऊन सन्मान केला पण आज त्याचे पुञ दोन्ही पक्षांचे उपकार विसरलेत की काय ‼ असा प्रश्न सर्वसामान्य माणूस विचारत आहेत.*


*आज 30/35 वर्षाचे वय असेल अशा वयात आमदारकी साठी एवढ हापहापन चांगल नाही. कारण या तरूणाला राजकारणात आणखी 35 वर्ष आहेत एवढे वर्ष ते सक्रिय राजकारण करू शकतात.*

*आज नाही उमेदवारी मिळाली म्हणून काय झाल, भविष्यात त्याच्या निष्ठेचा संयमाचा नक्कीच विचार पक्ष करेल यात शंकाच नाही.पण आमदारकी साठी हापापलेल्या या तरुणाला आमदारकीचे डोहाळे लागले आहेत.* *शिवाय वडिलोपार्जित परिवारावर लक्ष्मी प्रसन्न असल्यामुळे लक्ष्मी पुञ व धनवान आहेत.*

*आणी ते धन त्यांना शात बसू देत नाही.* *आणी म्हणूनच ते त्या धनाचे बळावर आपल्या मातृ पक्षाने केलेल्या उपकाराची जाण न ठेवता, दहा करोडात तुतारी वाजवायला निघाले आहेत.*


*1998 ला शिव सेनेने राजेंद्र पाटणी याचे धन पाहून काँग्रेस च्या बबनराव चौधरी याचे विरोधात विधान परिषदेची उमेदवारी दिली व ते लक्ष्मी दर्शन देऊन प्रचंड मतांनी विजयी होऊन काँग्रेस च्या परंपरागत गडाला सुरूग लावला जो आज पूर्णतः उध्वस्त झाला आहे.*


*विधान परिषदेत विजयी झाल्यानंतर पाटणी यांनी मागे वळून पाहले नाही.* *त्यांनी काळाची दिशा मतदार संघाची दशा ओळखून कारंजा मतदार संघात संपर्क वाढवला कारण बाहेरच्या उमेदवाराला निवडून देण्याची परंपरा असलेला अशी ओळख असलेल्या मतदारांची नाळ पाटणी यांनी हेरली व कारंजा मतदार संघात संपर्क वाढवून छोटी मोठी कामे करून मतदार संघ बांधला!* *त्याच फळ त्यांना 2004 च्या निवडणुकीत मिळाल!* 

*ते शिव सेनेच्या उमेदवारी निवडणूक लढवून आमदार झालेत.*

*2009 च्या परिसिमन आयोगाच्या पुनर्रचनेत मतदार संघात मानोरा तालुक्याचा समावेश करण्यात आला,* *मानोरा तालुका नवीन असल्यामुळे व त्या वेळेला स्थानिक उमेदवार हा मुद्दा ऐरणीवर आल्यामुळे स्थानिक उमेदवार प्रकाश डहाके यांचेकडून पाटणी यांना पराभव पत्करावा लागला* 


*2014 ला विधान सभा निवडणूकीत शिव सेनेने स्थानिक खासदार याच्या हट्टाग्रह,अट्टाहास,वैयक्तिक स्वार्थ व विरोधामुळे शिव सेनेन उमेदवारी नाकारली.* *म्हणून राजेंद्र पाटणी यांनी काळाची पावले व दिशा ओळखून व देशात असलेली मोदी लाट हेरून शिवाय भाजप सेनेची तुटलेली युती या संधीचा योग्य फायदा लाभ करून घेत युती तुटल्या मुळे भाजप ला योग्य व दमदार सक्षम उमेदवार तर पाटणी याना पक्ष यातून पाटणी यांनी भाजपची उमेदवारी घेतली व मोदी लाटेत प्रचंड मतांनी निवडून आले.*


*त्यानंतर 2019 ला पुन्हा भाजपकडून विजयी झाले. 1990 मध्ये विदर्भ विर गुलाबरावजी गावंडे यांनी मिळवलेला व बांधून तयार केलेला शिव सेनेचा कारंजा मतदार संघाचा बालेकिल्ल्या पाटणी यांनी 2004 मध्ये पाटणी यांनी पुन्हा मिळविला होता पण स्थानिक खासदार याचे हेकेखोर पणा मुळे पार उध्वस्त झाला जो आजपर्यंत शिव सेनेला उभा करता आला नाही*


*आज महाविकास आघाडीत शिव सेनेला हा आपला बालेकिल्ला असलेला मतदार संघ मिञ पक्षाला तुतारी ला सोडावा लागत असेल तर काय दिवस आलेत!*


*आणी ज्याच्या बापानी हा बालेकिल्ला पधरा वर्षांनंतर शिव सेनेला मिळवून दिला,* *त्याचाच पुञ तुतारी फुकायला निघाला!काय गंमत आहे ना!* *एक वेळ बापाच ठिक होत योग्य होत अस समजून घेऊ, कारण बापानी मतदार संघ बांधला होता. मेहनत घेतली होती.मिञ परिवार, मावळे,कार्यकर्त्याची फौज उभारली होती. त्यामुळे त्याचा शिव सेनेच्या उमेदवारीवर प्रथम हक्क व अधिकार होता. मजबूत दावा होता पण..........*


*पुञाच योगदान काय* ⁉ 

*कार्य काय* ⁉ 

*कर्तुत्व काय* ⁉ 

*योग्यता काय*  ⁉ 

*फक्त आमदार पुञ असणे* ‼️


*बर आपण आज तरूण आहात,आपल्याला आणखी भरपूर वेळ आहे. पुर्ण आयुष्य पडलेल आहे.थोडा संयम,धिर,पक्षावर विश्वास ठेवायला पाहीजे होता पण आपण*.....................


*आमदार होण्याच्या हवासापायी कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहात.काय काय करत आहात. कोणा कोणाच्या भेटी गाठी घेत आहात. कोणाच्या नादी लागून आपल राजकीय नुकसान करत आहात. याचा विचार केलाय का*❓️

*ज्या व्यक्ती सोबत बसून आपण मुंबई मधील पंचतारांकित हॉटेल मध्ये बसून खलबत करत आहात.त्या व्यक्तीने वाशिम मतदार संघात  शिव सेनेची व शिव सैनिकाची प्रतिष्ठा पार धुळीस मिळवून टाकली*


*उप-याला पक्षात प्रवेश देऊन,उमेदवारीच बक्षीस देऊन,निष्ठावंता च्या ढु........ गणावर अशी लाथ मारली! की लाथीचा शिक्का, वळ मिटता मिटत तर नाहीच! शिवाय तोंडावर पडून असे तोड फुटले की कोणताच डॉक्टर सर्जरी करायला तयार नाही. कारण समारचाही नामवंत प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉक्टर* ‼️ 


*मग डॉक्टर डॉक्टर भाई भाई*‼️


*म्हणून ज्ञायक पाटणी आपण थांबायला हव, थोडा संयम ठेवा,सबुरीने घ्या!! वाट पहा पक्ष आपल्याला न्याय देईलच! पण चुकीचा निर्णय घेऊन वडीलाने कमावलेल पुण्य, मिञ परिवार, जनता जनार्दन, नाव धुळीस मिळवू नका* ‼️


*आज उद्या पक्ष आपल्या संयमाची,बलिदानाची,त्यागाची, कार्याची, योगदानाची, निष्ठेची योग्य वेळी योग्य दखल घेऊन आपल्याला न्याय देईलच यात शंकाच नाही.पण..........*


*आता आपण भारतीय जनता पक्ष सोडून तुतारी फूकणार असाल तर........*

*राष्ट्रवादीच्या फुटीनंतर, उभी फुट पडल्या नंतर, पक्षाची पार वाताहात झाल्यानंतर, पक्ष रसातळाला गेल्यानंतर ज्या ज्या व्यक्तीनी खंबीर पणे शरद पवार यांचे नेतृत्व मान्य करून सोबत राहीले, पक्षाच नवीन नाव,नवीन चिन्ह गावा गावात, घरा घरात पोहचवल, पक्षाला जिवंत ठेवल, संघर्ष केला, पक्षांसाठी वाहून घेतल, शरद पवार याची साथ दिली.*

*असे अनेक मान्यवर आहेत जे कारंजा मतदार संघात विधान सभेच्या उमेदवारीला पाञ आहेत पण...........*

*आपल्या सवाल दस करोड का! मुळे त्यांच्यावर फार मोठा अन्याय होईल! आणि तस झाल तर ते दुखावले जातील, ते दुखावले गेले तर...........*


*जे दुखी आत्मे अनेक आहेत! ते आपल्याला मनापासून सहकार्य करतील का* ❓️


*मग अशा हाडाच्या मासाच्या कार्यकर्त्यांनी करायच काय* ⁉

*कित्येक वर्ष काम करणाराच भवितव्य काय* ⁉ 

*पडतीत साथ देणारे!*

*सुरवातीपासून सोबत असणारे!*

*खादयाला खादा लावून काम करणारे!*

*शरद पवार याच्या विचार धारेवर विश्वास असणारे!*

*शरद पवार यांना नेता मानणारे!*

*त्याच नेतृत्व मान्य असणारे!*

*शरद पवार याचे खंदे समर्थक!*

*पक्ष फुटीनंतर सुरवातीपासून सोबत असणारे!*

*वाईट काळात साथ देणारे!*

*पक्षाचा झेंडा सदैव फडकत ठेवणारे!*

*एकदिलाने पक्षासाठी झटणारे!*

*पक्षात उभी फुट पडल्यानंतर सत्तेची लालचा न करता निस्वार्थ पणे शरद पवार गटात राहून पक्ष बांधणी व संघटन कार्य करत पक्ष उभारणीत योगदान असणारे!*

*पक्षांसाठी खस्ता खाणारे!*

*गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण मतदारसंघात दौरा करून मतदार संघ पिंजून काढणारे!*

*शरद पवार गटात राहून एक निष्ठेने काम करत पक्ष, पक्ष चिन्ह, पक्षाचे विचार,गावा-गावात, घरा-घरात माणसा माणसा पर्यंत पोहचविणारे!*


*अनेक शिलेदार शरद पवार गटात सक्रिय आहेत.विविध पदांवर,विविध माध्यमांतून पक्षात काम करत पक्ष उभारणीत योगदान आहे.बलिदान आहे.व त्याग करून सहकार्य करत आहेत.*


*ज्या मध्ये प्रामुख्याने नाव घेता येईल असे डॉ. श्याम जाधव नाईक, सुनील पाटील दहाञे, डॉ.वर्षा राठोड, ज्योती गणेशपुरे, इमरान शेरूभाई फकीरावाले, प्रणित मोरे, अनेक मान्यवर आहेत.*


*अनेक मान्यवर आहेत जे शरद पवार गटात प्रमुख व मजबूत दावेदार तर आहेतच शिवाय योग्य, दमदार,सक्षम, लायक,लोकप्रिय सुध्दा* ‼️ *आहेत.*


*मग अशाना डावलून वेळेवर फक्त आमदार होण्यासाठी जर कोणी लक्ष्मी दर्शन देऊन उमेदवारी मिळवण्यात यशस्वी होत असेल तर.*.........

*वर्षानुवर्ष पक्षात काम करण्याचा फायदा काय* ⁉ 

*निष्ठा,बलिदान,त्याग,काम,कार्य,संघर्ष,उगाळून पियाचा काय* ⁉

*म्हणून पक्षश्रेष्ठी नी सुध्दा पक्षात काम करणारे इच्छुक उमेदवार,याचा सारासार विचार करून,कार्यकर्त्याच्या भावनांचा सुध्दा विचार करावा!*

*जेणेकरून पक्षात नाराजी होणार नाही.असंतोष निर्माण होणार नाही.कार्यकर्ते दुखावणार नाहीत.*

*पैशाच्या जोरावर उमेदवारी दिली जात असेल तर पक्षावरचा, पक्ष नेतृत्वावरचा सर्व सामान्य नागरिकाचा विश्वास पूर्णतः उडून जाईल!*


*तसेच महाविकास आघाडीला भरभरून मतदान करणाऱ्या मुस्लिम व बौद्ध मतदारांनी सुद्धा आत्मचिंतन कराव! विचार करावा तुम्ही ज्या विचारान,ध्येयान,उद्देशान लोकसभेला संजय देशमुख यांना मतदान केल. ते तुमचे धर्मनिरपेक्ष खासदार महोदय कडवट कट्टर हिंदुत्ववादी विचार असलेल्या पक्षातून आलेल्या हिंदुत्वादी विचार असलेल्या व्यक्तीला  फक्त धनाढ्य,श्रीमंत;लक्ष्मी पुञ या एकमेव निकषांवर उमेदवारीची डिल करत असतील तर काय*.................

*तो योग्य बोध घ्यावा* *!!*

*महाविकास आघाडीचे खासदार संजय देशमुख व कारंजा चे इच्छुक उमेदवार ज्ञायक पाटणी, कॅप्टन प्रशांत सुर्वे एका पंचतारांकित हॉटेल मध्ये गंभीर विषयावर चर्चा करताना बसलेले आपल्याला दिसत आहे*

*यावरून आपण कल्पना करू शकता राजकारणात काहीही होऊ शकत!*


*राजकारण अनिश्चिततेचा खेळ आहे.*

*इथे कोणी कोणाचा कायम शञु नसतो. हे वरिष्ठ स्तरावर बर!*


*शञु तत्व असत ते कार्यकर्त्यात व सर्वसाधारण माणूस व नागरिक याचेत.*


*म्हणून हा लेख आपल्या हाती पडे पर्यंत कदाचित ज्ञायक पाटणी याचा शरद पवार गटात प्रवेश झालेला असु शकतो. आणी कदाचित उमेदवारी पण जाहीर झालेली असु शकते!*


*हि सगळी किमया,जादू,चमत्कार फक्त लक्ष्मी दर्शन च करू शकते!*

*हे ही सत्य आहे! वास्तव आहे!*

*वाशीम मतदार संघात सुध्दा वरपासून तर खालपर्यंत सर्वाना लक्ष्मी दर्शन देऊन खुश करण्यात आल!*

*कारंजा मतदार संघात सुध्दा तिच शक्यता जास्त दिसत आहे.*


*कारण सवाल दस करोड का* ‼️

*आहे भाऊ!*

*म्हणून कार्यकर्त्यांनी पक्ष श्रेष्ठी जर पक्षनिष्ठ कार्यकर्त्याचा, त्याच्या भावनांचा आदर करत नसेल तर.......*

*कार्यकर्त्याला न्याय देत नसेल तर*..........

*आपणच किती पक्षनिष्ठ राहायचं किती पक्षनिष्ठा पाळायची याच आत्मचिंतन केल पाहीजे*‼️

*गंभिर विचार केला पाहीजे*

*चुकीच्या निर्णया विरोधात आवाज उठवला पाहिजे तरच लक्ष्मी दर्शन ही पक्षात उमेदवारी देतांना वाढत चाललेली संस्कृती कुठेतरी थांबेल*⁉️

*अन्यथा सर्व सामान्य नागरिकाच काय खर नाही*

*वर्षानुवर्ष पक्षात काम करणारा कार्यकर्ता तसाच सडला म्हणून समजा*‼️‼️


*म्हणून चुकीला विरोध करा! खंभीर* *व्हा! गंभीर व्हा! व्यक्त व्हा!सक्त व्हा*!

*लिडर व्हा! निडर व्हा!*

*अशा लक्ष्मी कृपेने आयत्या वेळी पक्षात प्रवेश घेऊन उमेदवारी मिळवणाऱ्या आयाराम गयाराम ना योग्य धडा शिकवा! चांगली अद्दल घडवा!*


*डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून दिलेल्या अधिकाराचा वापर करून मत पेटीतून राजा तयार करा!*


*राजाच्या मुलाला वारशाने राजा होऊ देऊ नका!!*


*लोकशाही वाचवा!!*

               *लेखन*              *अण्णाभाऊ चौधरी**              *चेहेल*

*मंगरूळनाथ*

*वाशीम*

Post a Comment

0 Comments