Ticker

6/recent/ticker-posts

*राज्यात महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीचा बिगुल वाशिम मधूनमहाविकास आघाडीची उमेदवार डॉक्टर सिद्धार्थ देवळेंसाठी महाबैठक*


वाशिम दि. 25 महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीचा बिगुल वाशिम मधून शुक्रवारी(दि .२५)झाला. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर सिद्धार्थ आकारामजी देवळे यांच्या वाशिम विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारीला यावेळी महा विकास आघाडीतील समस्त मंडळींनी एकजुटीने मान्यता दर्शविली. ह्यावेळी खासदार संजय देशमुख, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. सुधीर कव्हर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा वाशिम जि. प. अर्थ व बांधकाम सभापती सुरेश मापारी, यवतमाळ वाशिम लोकसभा संघटक कॅप्टन प्रशांत सुर्वे,  जिल्हा संघटक गजाननराव देशमुख ,काँग्रेसचे  प्रदेश महासचिव  दिलीपराव सरनाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार  चे जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे पाटील, वाशिम न.प. माजी उपाध्यक्ष माधवराव अंभोरे, बाजार समिती संचालक राजूभाऊ चौधरी , सुभाष राठोड यांचे सह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खासदार संजय देशमुख यांनी डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच्या नेतेमंडळींची सुद्धा प्राधान्याने मान्यता घेऊन ही उमेदवारी निश्चित केल्याचे सांगितले. डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांनी आपल्या विकासाचे व्हिजन यावेळी मांडले सर्वांना सोबत घेऊन चालणार ह्याची ग्वाही दिली.
वाशिम येथील स्वागत लान येथे शुक्रवारी (दि. 25) रोजी महाविकास आघाडीची संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर महाविकास आघाडीचे खासदार संजय देशमुख, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख डॉक्टर सुधीर कव्हर शिवसेना जिल्हाप्रमुख तथाअर्थ व बांधकाम सभापती सुरेश मापारी, यवतमाळ  वाशिम लोकसभा मतदारसंघ संघटक कॅप्टन प्रशांत पाटील सुर्वे वाशिम जिल्हा संघटक गजाननराव देशमुख काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस एडवोकेट दिलीपराव सरनाईक ,वाशिम जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चक्रधर गोटे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वाशिम जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे पाटील, वाशिम न.प. माजी उपाध्यक्ष माधवराव अंभोरे, बाजार समिती संचालक राजूभाऊ चौधरी व सुभाष राठोड, शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सह संपर्कप्रमुख डॉ .सुधीर कव्हर,  काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी मधुकरराव जुमडे, शेतकरी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष राजुभाऊ वानखेडे, शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मंगलाताई सरनाईक, युवती सेना जिल्हाध्यक्षा प्रियाताई महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे मार्गदर्शक प्राचार्य अरुणराव सरनाईक ,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ वैशाली मेश्राम,  शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील राऊत, माणिकराव देशमुख, नागोरावजी ठेंगडे , पांडुरंग पांढरे, युवा सेना जिल्हाध्यक्ष नितीन मडके ,जुबेर मोहनावाले, काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ पदाधिकारी वाशिम जि प चे माजी सभापती रमेश पाटील शिंदे, माजी जि.प. सभापती किसनराव मस्के, जि प सदस्य दिलीप मोहनावाले ,माजी समाज कल्याण सभापती सिद्धार्थ देवरे, तालुकाध्यक्ष महादेवराव सोळंके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार चे वाशिम तालुका अध्यक्ष रमेश पाटील गोटे, मंगरूळपीर तालुका अध्यक्ष राजेश टोपले पाटील,  शिवसेनेचे वाशिम तालुका अध्यक्ष तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, मंगरूळपीर तालुका अध्यक्ष रामदास सुर्वे, शिवसेनेचे वाशिम शहर प्रमुख गजानन ठेंगडे, मंगरूळपीर शहर प्रमुख सचिन परळीकर, वाशिम शहर उपाध्यक्ष अकील भाई तेली व गणेश पवार आदींची  मंचावर प्रमुख उपस्थिती होती यावेळी खासदार संजय देशमुख यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना असो काँग्रेस पक्ष असो की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असो या सर्वांना विश्वासात घेऊन तसेच राज्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मंडळी या  सर्वानुमते वाशिम विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी उच्च विद्या विभूषित डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळाली असे स्पष्ट केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भाऊ मापारी यांनीलोकसभा निवडणुकीपेक्षाही यावेळी अधिक मताधिक्य घेत महाविकास आघाडी डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांना निवडून आणेलअशी ग्वाही दिली .आणि महाविकास आघाडीच्या समन्वयातून डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांची उमेदवारी निश्चित झाली असे स्पष्ट केले. काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस एडवोकेट दिलीपराव सरनाईक यांनी आम्ही काँग्रेस पक्षाकडे वाशिम ची जागा मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र महाविकास आघाडीने जो निर्णय घेतला तो निर्णय ठामपणे मान्य करून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापेक्षाही दोन पावले पुढे राहून सिद्धार्थ देवळे यांच्या विजयासाठी कटीबद्ध असल्याचे ग्वाही दिली यावेळी कोरोनाकाळात अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून रुग्णांना वापस आणून जीवनदान देण्याचे अष्टो प्रहार कार्य डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांनी केल्याचे आवर्जून सांगितले, वाशिम जिल्हा परिषद उपाध्यक्ष चक्रधर गोटे यांनी वासिम विधानसभा मतदारसंघात गत पाच वर्षापासून सातत्याने जनसंपर्क डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांनी ठेवला विदर्भात सर्वाधिक मतांनी ही शीट निघेल असा दावा त्यांनी केला.  लोकसभा निवडणुका आटोपल्या त्या क्षणी आपण  शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे)शिवसेना पक्षाला डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांचे नाव सुचविले होते असा गोप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे पाटील यांनी केला. ह्यावेळी बाजार समिती संचालक राजू भाऊ चौधरी यांनी डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांच्या विजयासाठी जीवाचे रान करू असे आवाहन केले. यावेळी डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांनी आपणास राजकारणात आणण्यात काँग्रेस कमिटीचे प्रदेश महात सचिव दिलीपराव सरनाईक यांचे मोठे योगदान राहिले असल्याची सांगून, शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षात‌प्रवेश‌ केला.लोकसभा निवडणुकीत आपण महाविकास आघाडीच्या  सर्वसमावेशक विचारधारेची बांधील होतो असे संकेत दिले. ह्या विधानसभा मतदारसंघातील तरुणाईच्या बेरोजगारीच्या प्रश्नाला त्यांनी हात घातला आणि प्राधान्याने वाशिम ची एमआयडीसी मध्ये जास्तीत जास्त उद्योग आणून रोजगारांच्या हाताला काम देण्याची ग्वाही देऊन सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे आश्वासन दिले. यासोबतच यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी मधुकरराव जुमडे यांचे सह अनेकांची भाषणे झाली. यावेळी महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीतून लोकसभा निवडणुकीतील मताधिक्यापेक्षाही अधिक मताधिक्य घेत डॉक्टर सिद्धार्थ देवळे विजय करण्याचा निर्धार केला. संचालन वाशिम उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख यांनी केले.
यावेळी महाविकास आघाडीतील शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मंडळी मोठ्या प्रमाणात या बैठकीला उपस्थित होती

Post a Comment

0 Comments