वाशिम मंगरूळपीर विधानसभेकरिता इच्छुक असलेले निष्ठावंत शिवसैनिक राजाभय्या पवार हे दिनांक 28 ऑक्टोबर रोजी अकरा वाजून तीस मिनीटाने आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत यावेळी ते छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून तसेच नाल साहेब आणि श्री बालासाहेब संस्थांचे दर्शन घेणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून त्यांची रॅली निघणार आहे या रॅलीमध्ये निष्ठावंत शिवसैनिकासह राजाभय्या पवार यांना मानणारा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उभाटा गटाची खासदार निवडून आणण्यामध्ये राजाभय्या पवार यांनी तळागाळातील सर्वसामान्य पर्यंत मशाल पोचविण्याचे चांगले काम केले होते वाशिम मंगळूर विधानसभा मतदारसंघातून राजाभय्याना मानणारा चांगला वर्ग असून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्यामुळे केवळ जनतेच्या आग्रहास्तव आपण हा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया राजाभय्या पवार यांनी दिली आहे
0 Comments