Ticker

6/recent/ticker-posts

*विधानसभेसाठी जिल्ह्यात अंदाजे ६६टक्के मतदान*


वाशिम : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील तीन मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत झालेले अंदाजे ६६ टक्के एवढे आहे. अंमित आकडेवाडी प्राप्त झाल्यानंतर यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे संबंधितांनी सांगितले. यावेळी वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा कोणाला लाभ होतो याची देखील चर्चा सुरू आहे. मतपेट्या स्ट्रॉग रूममध्ये जमा करण्यात आल्या आहेत जिल्ह्यात तिनही मतदार संघात कुठलाही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया पार पडल्याची माहिती आहे आता २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याने वाशिम जिल्ह्यातील आमदार कोण हे शनिवारी स्पष्ट होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता पासून जिल्ह्यातील अकराशे केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू झाली. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासन व निवडणूक विभागाच्या वतीने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या होत्या यामध्ये काही केंद्राची रंगरंगोटी, काही ठिकाणी महिला केंद्रे, काही ठिकाणी युवा केंद्र स्थापन करण्यात आले होते तर जिल्ह्यात एका नवीन केंद्राची देखील यावेळेस स्थापना करण्यात आली. एकंदरीतच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वच बाबींनी प्रयत्न केले यामध्ये प्रशासनाला बऱ्यापैकी यश देखील आल्याचे बोलवल्या जात आहे सुरुवातीला मतदान धिम्म्या गतीने झाले मात्र जसजशी मतदानाची वेळ संपत येत होती तसतशी मतदान केंद्रावर गर्दी वाढताना दिसत होती. जिल्ह्यात असलेल्या दहा लाख ९ हजार १०७ मतदारांपैकी किती जणांनी मतदान केले. हैं अंतिम आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर कळू शकेल. जिल्हयातील

अपंग व वृद्ध मतदारांना मतदान करता यावे यासाठी घरपोच मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. ही प्रक्रिया यापूर्वीच पार पडली. दरम्यान जिल्हयातील तिनही विधानसभा मतदार संघात काही केंद्रावर उशिरापर्यंत मतदान सुरु असल्याने अंतिम आकडेवारी मिळण्यास वेळ लागल्याचे सुत्रांनी सांगितले. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक विभागाने केलेल्या आवाहनाला ग्रामीण व शहरी भागातून चांगलाच प्रतिसाद मिळाला.

काटयाची लढत होवून कोणत्या मतदार संघातून कोणाचा विजय होवू शकेल. याबाबत स्पष्ट ग्वाही कुणीही देत नव्हते. जिल्हयात मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. आता २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मत मोजणीची जिल्हा वासीयांना चिता लागली असून मतमोजणीत कोणत्या मतदार संघात कोणता उमेदवार विजयी होतो. याकडे कार्यकर्त व उमेदवारांचे लक्ष लागले आहे. २३ नोव्हेंबर रोजी रिसोड, वाशिम व कारंजा या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.

Post a Comment

0 Comments