Ticker

6/recent/ticker-posts

*कारंजा मतदारसंघात ज्ञानायक पाटणी यांच्या पत्नी प्रचारासाठी मैदानात *


कारंजा : राष्ट्रवादी काँग्रेसपक्षश रदचंद्र पवारव महाविकास आघाडीचे कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवारॲड. ज्ञायक पाटणी यांनी प्रचारात चांगली सरशी घेतली आहे. कारंजा शहरात त्यांच्या प्रचाराचा धडाका सुरू असून याकामी त्यांना धर्मपत्नी चंचल पाटणी यांची देखील मोलाची साथ मिळत आहे.

कारंजा - मानोरा विधानसभा मतदार संघात २६५ गावे आहेत. प्रत्येक गावात जावून ज्ञायक पाटणी मतदारांच्या भेटीगाठी घेवून त्यांच्याही संवाद साधत आहे. यामधून गावकरी आपल्या विविध समस्या सांगत असून त्यांना या समस्या निकाली काढण्याचा ते भरवसा देत आहे. दरम्यान, मतदानाची तारीख तोंडावर आली

असताना उमेदवार पाटणी यांनी प्रचाराला अधिक वेग दिला आहे. अशात त्यांच्या प्रचारकामात त्यांची पत्नी चंचल पाटणी या सामील होत शहराच्या विविध भागात जावून पुरुष व महिला मतदारांच्या भेटी घेत आहेत. यादरम्यान घरोघरी महिला मतदार त्यांचे स्वागत करताना दिसत आहे. यावेळी पतीच्या प्रचाराचे साहित्य देवून त्या मतदारांना ज्ञायक पाटणी यांना मतदान करावे असे आवाहन करत आहे. उमेदवार पाटणी यांच्या प्रचारकामात महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते तथा समर्थक आणि मतदार स्वयंस्फूर्तीने सामील होत असल्याने त्यांच्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले दिसत आहे.

Post a Comment

0 Comments