वाशिम : अतिशय साधे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे श्याम खोडे यांची
विजयी मिरवणूक शहरात जल्लोषात काढण्यात आली. या विजयी जल्लोषाने वाशिम शहर अगदी दणाणून गेले होते.
यावेळी सा. ग्राम प्रभा शी बोलताना शाम खोडे म्हणाले की मतदारांनी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे मी अक्षरशः भारावून गेलो असून मतदारसंघातील समस्त मायबाप मतदारांसमोर मी नतमस्तक आहे. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना तसेच सर्व मित्र पक्ष समस्त वरिष्ठ नेते पदाधिकारी कार्यकर्ते व सामान्य मतदार तसेच मातृ शक्तीने जे अविश्रांत काम केले त्यामुळे माझा विजय साध्य झाल्याचे श्याम खोडे यांनी सांगितले. मतदार संघातील माझ्या सर्व लाडक्या बहिणींचे विशेष आभार. महायुतीचे नेते पदाधिकारी व मतदार संघातील जनतेच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. अशी ग्वाही यावेळेस श्याम खोडे यांनी दिली. मतदार संघातील विविध प्रलंबित प्रश्न व मतदार सघाच्या विकासाची जबाबदारी आपल्यावर पडली असून मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशिल राहू असे नवनिर्वाचीत आमदार श्याम खोडे यांनी सांगितले.
0 Comments